शेतजमीन विक्री करुन महिलेची फसवणूक करणारा संशयित अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 09:38 PM2020-10-19T21:38:22+5:302020-10-19T21:38:34+5:30

शनिपेठ पोलिसांनी मध्यप्रदेशातून आवळल्या मुसक्या ः बनावट दस्तावेज व खोट्या महिलेचा केला वापर

Suspect arrested for cheating woman by selling farmland | शेतजमीन विक्री करुन महिलेची फसवणूक करणारा संशयित अटकेत

शेतजमीन विक्री करुन महिलेची फसवणूक करणारा संशयित अटकेत

Next

जळगाव : बनावट दस्तावेज तयार करुन तसेच खोटी महिला उभी करीत महिलेची शेतजमीन विक्री करणारा संशयित आरोपी गेल्या सहा महिन्यांपासून फरार होता. या संशयित आरोपी जयकिसन भगवान पाटील रा. शनिपेठ याला सोमवारी मध्यरात्री मध्यप्रदेशातून पोलिसांनी अटक केली.

गुजरातमधील आशा सुनील ढोलकिया (४५ ) यांच्या मालकीचे कंडारी शिवारात शेत आहे. संशयित प्रकाश रामचंद्र नेहकर याने आपल्या फायद्यासाठी या शेताचे बनावट कागदपत्र व उतारा तयार केला. तसेच त्या कागदपत्रांवर आशा ढोलकिया यांचे नाव लावून व बनावट महिला उभी करुन खरेदीखत तयार करीत दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी केली होती. त्याचप्रमाणे या संशयित आरोपीने शासनाची कोणतीही परवानगी न घेता कुणत्याही प्रकारचा नजराणा भरलेला नसून शासनाची फसवणूक केल्याची घटना ६ नोव्हेंबर २०११ रोजी घडली होती. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात १४ मार्च रोजी प्रकाश नेहकर याच्यासह दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुख्य संशयित आरोपी प्रकाश नेहकर याच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. त्याला घरुन अटक केली होती.

मध्यप्रदेशातून केली अटक
गुन्हा दाखल झाल्यापासून दुसरा संशयीत आरोपी जयकिसन भगवान पाटील रा. शनिपेठ हा देखील फरार होता. जयकिसन हा मध्यप्रदेशात असल्याची माहिती पोहेकाँ रविंद्र सोनार यांना मिळाली. त्यांनी तात्काळ संतोष खवले व सचिन वाघ यांना सोबत घेत मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील माकड खेडा तहसील तरसावंद येथून जयकिसन याला मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास अटक केली. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्याला २ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी अजून एक संशयित आरोपी फरार असून पोलीस पथक त्याच्या मागावर आहे.

Web Title: Suspect arrested for cheating woman by selling farmland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.