दुचाकीस्वाराला लुटल्याच्या प्रकरणात संशयिताला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:13 AM2020-12-26T04:13:31+5:302020-12-26T04:13:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : इंद्रप्रस्थनगरातील रिक्षा स्टॉपजवळ पवन बबन आढाळे (रा. त्रिभुवन कॉलनी) याला मारहाण करून लुटल्याप्रकरणी शुक्रवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : इंद्रप्रस्थनगरातील रिक्षा स्टॉपजवळ पवन बबन आढाळे (रा. त्रिभुवन कॉलनी) याला मारहाण करून लुटल्याप्रकरणी शुक्रवारी शहर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.भाग्यवंत उर्फ भैया धीरज पाटील (२३, रा. इंद्रप्रस्थनगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
२२ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास पवन आढाळे हा मित्रासह इंद्रप्रस्थनगरातील रिक्षा स्टॉपजवळून दुचाकीने जात होता. त्यावेळी भूषण भरत सोनवणे, संदीप मधुकर निकम व भाग्यवंत पाटील यांनी पवन याला रस्त्यात अडवून मारहाण केली होती. त्यानंतर त्याच्या खिशातून आठशे रुपये काढून घेतले होते. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आतापर्यंत भूषण व संदीप याला अटक करण्यात आलेली होती. भाग्यवंत हा फरार होता. अखेर भाग्यवंत हा इंद्रप्रस्थनगरात असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी बशीर तडवी व तेजस मराठे व योगेश इंधाटे यांना शुक्रवारी सकाळी मिळाली. त्यांनी लागलीच इंद्रप्रस्थनगर गाठून त्यास अटक केली. यावेळी सहाय्यक फौजदार वासुदेव सोनवणे, विजय निकुंभ, रतन गीते आदी उपस्थिती होते.