भुसावळात ६० वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 10:14 PM2019-04-14T22:14:15+5:302019-04-14T22:14:51+5:30

घातपात झाल्याची शंका ; शवविच्छेदनानंतर कळणार कारण

Suspected death of 60-year-old woman in Bhusaval | भुसावळात ६० वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू

भुसावळात ६० वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू

Next


भुसावळ- शहरातील अकबर टॉकीज परीसरातील ८० वर्षीय बेपत्ता महिला सरला अशोक भांडारकर यांचा हात नसलेल्या अवस्थेतील मृतदेह रेल्वेच्या झेडआरटीआय परीसरात रविवारी सकाळी आढळल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
या महिलेचा खून करण्यात आला की अन्य कारणाने तिचा मृत्यू झाला? याबाबत ठोस कारण कळू शकले नाही. वैद्यकीय पथकाने जागेवरच या महिलेचे शवविच्छेदन केले.
पतीच्या मृत्यूनंतर आपली ३७ वर्षीय मतिमंद मुलगी सारीकासह सरला भांडारकर या अकबर टॉकीज भागात भाड्याच्या घरात राहत होत्या. गुरुवारी त्यांच्यासह मुलगी सारीका घरातून बेपत्ता झाल्याचे त्यांच्या परीचितांनी त्यांच्या रेल्वेत खलाशा असलेल्या स्नुषा कल्याणी जितेंद्र भांडारकर (१५ बंगला, भुसावळ) यांना माहिती दिली . सासु व त्यांची मुलगी बेपत्ता झाल्याने कल्याणी यांनी त्यांच्या अकबर टॉकीज भागातील घराला भेट दिली. तर घराबाहेर सारीका जखमी अवस्थेत असल्याने त्यांनी तिच्यावर औषधोपचार करून शनिवारी शहर पोलिस ठाणे गाठत कैफियत मांडली. पोलिसांनी या प्रकरणी सरला भांडारकर बेपत्ता झाल्याबाबत मिसिंगची तक्रार दाखल केली. दरम्यान या घटने मागील कारण गुलदस्त्यात आहे.
 

Web Title: Suspected death of 60-year-old woman in Bhusaval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.