डॉ.पायलच्या आत्महत्येतील संशयितांना इतर महाविद्यालयात प्रवेश नको

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 02:01 PM2020-08-14T14:01:20+5:302020-08-14T14:07:24+5:30

लोकसंघर्ष मोर्चाच्यावतीने सह्यांची मोहीम : मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

Suspects in Dr. Payal's suicide do not give admission in other colleges | डॉ.पायलच्या आत्महत्येतील संशयितांना इतर महाविद्यालयात प्रवेश नको

डॉ.पायलच्या आत्महत्येतील संशयितांना इतर महाविद्यालयात प्रवेश नको

Next
ठळक मुद्देजळगावची रहिवाशी असलेल्या डॉ.पायल तडवी या आदिवासी समाजातील डॉक्टरचा जातीय छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सहकाऱ्यांविरुध्द मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव - डॉ.पायल तडवी हिला आत्महत्येस प्रवृत्त करुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांना अन्य वैद्यकीय महाविद्यालात प्रवेशास मनाई करण्याची स्पष्ट भूमिका महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात घ्यावी साठी लोक संघर्ष मोर्चाच्यावतीने गावागावात सह्यांची मोहीम राबविली व त्याचे निवेदन मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री व समाजकल्याण मंत्र्यांना मेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले.


जळगावची रहिवाशी असलेल्या डॉ.पायल तडवी या आदिवासी समाजातील डॉक्टरचा जातीय छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सहकाऱ्यांविरुध्द मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा जातीयवादी संशयितांना राज्यातील कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशास महाराष्ट्र सरकारने परवानगी देऊ नये व कोणत्याही स्थितीत जातीयवादी व गुन्हागरी प्रवृत्तींना पाठीशी घालू नये अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. ३१ आॅगस्टला सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणात सुनावणी होणार आहे. याआधी ११ आॅगस्ट रोजी कामकाज झाले. संघटनेच्या प्रतिभा शिंदे, कथा वसावे, पन्नालाल मावळे, इरफान तडवी, नुरा तडवी, धर्मा बारेला, सोमनाथ माळी, गाठू बारेला, फुलसिग वसावे, रमेश नाईक ,सचिन धांडे व संजय महाजन यांनी ही सह्यांची मोहीम राबविली.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी 

 

Sushant Singh Rajput Suicide : संजय राऊत, मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार, पाटणा पोलिसांकडे अटकेची मागणी 

 

सुशांतच्या कुटुंबीयांना शांत बसावं आणि मुंबई पोलिसांना सहकार्य करावं: संजय राऊत

Web Title: Suspects in Dr. Payal's suicide do not give admission in other colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.