संशय घेणाऱ्या नवऱ्यास पत्नीनेच दिला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 23:28 IST2021-04-07T23:28:04+5:302021-04-07T23:28:45+5:30

संतापलेल्या पत्नीने गळफास देऊन पतीचा खून केल्याची घटना गोंडखेल (ता.जामनेर) येथे सोमवारी रात्री घडली.

The suspect's husband was strangled by his wife | संशय घेणाऱ्या नवऱ्यास पत्नीनेच दिला गळफास

संशय घेणाऱ्या नवऱ्यास पत्नीनेच दिला गळफास

ठळक मुद्देगोंडखेल (ता.जामनेर) येथे सोमवारी रात्रीची घटना.

लोकमत न्युज नेटवर्क

जामनेर, जि. जळगाव : चारित्र्याच्या संशयावरून नेहमी भांडण करतो या कारणाने संतापलेल्या पत्नीने गळफास देऊन पतीचा खून केल्याची घटना गोंडखेल (ता.जामनेर) येथे सोमवारी रात्री घडली. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संशयावरून पत्नीस ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिलीप विश्वनाथ सोनवणे हा पत्नी संगीता हिला पाप लावत होता व नेहमी तिच्याशी भांडण करीत होता. याला कंटाळून संगीता हिने त्याच्या गळ्यास दोरीने फास दिला. फिर्यादी कल्पना युवराज जाधव ही दिलीपची आत्या असून, काल रात्री तिला भाऊ शंकर जाधव याचा फोन आला की, दिलीप हा हलत नाही. कल्पना या शंकर सोबत दिलीपच्या घरी गेल्या असता त्यांना खाटेवर दिलीप पालथा अवस्थेत पडलेला दिसला. त्यांना वाटले की सर्पदंश झाला असेल. एवढ्यात दिलीपचा ५ वर्षांचा मुलगा यश याने त्यांना सांगितले की, आईने पप्पांना दोरीने गळफास दिला. त्यांनी पुन्हा दिलीपची पाहणी केली असता त्याच्या तोंडातून पाणी गळत होते व कानातून रक्त बाहेर येताना दिसले.  ही घटना लक्षात येताच सर्व जण घाबरले. 

कल्पना जाधव यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलिसांनी संशयित पत्नी संगीता सोनवणे (३५) हिच्याविरुद्ध भादंवि कलम ३०२ नुसार गुन्हा नोंदविला आहे. तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे करीत आहे.

Web Title: The suspect's husband was strangled by his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.