जळगाव जिल्हा दूध संघातील १४ कर्मचारी निलंबीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:29 PM2018-06-23T12:29:05+5:302018-06-23T12:30:16+5:30
हलगर्जीपणा भोवला
जळगाव : जिल्हा सहकारी दूध संघातील निर्मिती व गुणवत्ता नियंत्रण विभागातील १४ कर्मचा-यांना कामातील हलगर्जीपणा चांगलाच भोवला असून या सर्व कर्मचाºयांना संघाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. गेल्या काही वर्षात प्रथमच कर्मचाºयांवर एवढी मोठी कारवाई झाल्याने कर्मचारी वर्गात खळबळ उडाली आहे.
जिल्हा दूध संघातर्फे बाजारात विक्री झालेल्या दुधाबाबत ग्राहकांच्या तक्रारी आल्याने दूध संघाच्या प्रशासनाने याची चौकशी करून यास कोण कारणीभूत आहे? याचा शोध घेतला. त्यात निर्मिती व गुणवत्ता नियंत्रण विभागातील ४ कायम कर्मचारी तर १० कंत्राटी कर्मचारी दोषी असल्याचे व त्यांनी कामात हलगर्जीपणा केल्याचे आढळून आले. याबाबत बुधवार, २० रोजी झालेल्या जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीतही चर्चा झाली होती. त्यात दोषी कर्मचाºयांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार गुरूवार २१ रोजी व्यवस्थापकीय संचालकांनी या १४ कर्मचाºयांना तडकाफडकी निलंबित करून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यात पंकज पाटील, पाचपांडे, खेडकर, कारले यांंच्यासह १४ कर्मचाºयांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.