भुसावळ दंगलीतील संशयीत आरोपींना कोठडी

By admin | Published: April 19, 2017 10:55 AM2017-04-19T10:55:39+5:302017-04-19T10:55:39+5:30

घरात शिरून दोघा भावांसह वयोवृद्धेला मारहाण केल्या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना 21 र्पयत पोलीस कोठडी सुनावण्यात आली़

Suspended accused in Bhusaval riots | भुसावळ दंगलीतील संशयीत आरोपींना कोठडी

भुसावळ दंगलीतील संशयीत आरोपींना कोठडी

Next

 भुसावळ,दि.19- घराजवळ शांतता राखा, आरडा-ओरड करू नका, असे सांगितल्याचा राग आल्याने शाब्दीक वाद विकोपाला जावून मोरेश्वर नगरात 10 एप्रिल रोजी दुपारी चार वाजता दंगल उसळली होती़ संशयीत आरोपींनी घरात शिरून दोघा भावांसह वयोवृद्धेला मारहाण केल्याचा आरोप होता़ या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना 21 र्पयत पोलीस कोठडी सुनावण्यात आली़ 

तक्रारदार अनिल राखुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी पापाराम रायसिंग पंडित, आकाश रायसिंग पंडित, आकाश रायसिंग पंडित, गोलू रायसिंग पंडित, तिलक चंडाले (सर्व रा़वाल्मीक नगर, भुसावळ) व 20 ते 25 वयोगटातील काळ्या-सावळ्या रंगाच्या अनोळखी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल होता़
आरोपींनी अनिल यांच्या चेह:यावर फायटर, लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली तसेच  भांडण सोडवण्यासाठी फिर्यादीचा भाऊ व आई आल्यानंतर त्यांनाही मारहाण करण्यात आली़ गुन्हा घडल्यानंतर शहर पोलिसांकडून आरोपींचा कसून शोध सुरू होता़ सोमवारी रात्री आरोपी शहरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल व पोलीस निरीक्षक वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय फारूक शेख, यासीन पिंजारी, विनोद वितकर, शंकर पाटील आदींच्या पथकाने आरोपींना अटक केली़ आरोपींना मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता 21 र्पयत पोलीस कोठडी सुनावण्यात आली़

Web Title: Suspended accused in Bhusaval riots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.