शहरातील २३ रेशन दुकानदारांचे परवाने निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 09:04 PM2017-12-02T21:04:07+5:302017-12-02T21:18:49+5:30
जिल्हा पुरवठा विभागातर्फे शहरातील ११२ दुकानांची अचानक तपासणी करण्यात आली होती़ यापैकी ३१ दुकाने बंद आढळून आली होती़ त्यांना नोटीस देण्यात आल्या होत्या़ ३१ पैकी २३ स्वस्त धान्य दुकानदारांचे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव यांनी दिली़ वितरण प्रणालीत फेरफार करुन अपहार केल्याप्रकरणी यातील ६ जणांवर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल होणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत़ . या धडक कारवाईने जिल्हाभरातील रेशन दुकानदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे़
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि़ २ - जिल्हा पुरवठा विभागातर्फे शहरातील ११२ दुकानांची अचानक तपासणी करण्यात आली होती़ यापैकी ३१ दुकाने बंद आढळून आली होती़ त्यांना नोटीस देण्यात आल्या होत्या़ ३१ पैकी २३ स्वस्त धान्य दुकानदारांचे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव यांनी दिली़ वितरण प्रणालीत फेरफार करुन अपहार केल्याप्रकरणी यातील ६ जणांवर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल होणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत़दरम्यानआणखी२९ जणांना नोटीसा देण्यात आल्या आहेत़ या धडक कारवाईने जिल्हाभरातील रेशन दुकानदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे़
जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या आदेशान्वये २१ नोव्हेंबर रोजी शहरात तपासणीसाठी पुरवठा विभागातर्फे विशेष मोहिम राबविण्यात आली होती़ यात २७ पथकांव्दारे १२० स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करण्यात आली होती़ बंद आढळून आलेल्या ३१ स्वस्त धान्य दुकानांना त्यांची अनामत रक्कम जमा करणे, परवाना निलंबित करणे अथवा रद्द करणे, तसेच फौजदारी स्वरुपाची कारवाई का करण्यात येवू नये, अशा स्वरुपाच्या नोटीसा देण्यात आल्या होत्या़
़़़तर कायमस्वरुपी परवाना निलंबित
२३ दुकानदारांचे परवाने निलंबित करण्यात आले असून ६ जणांबाबत निर्णय व्हायचा आहे तर २ जणांचे परवाने यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहेत़ निलंबित करण्यात आलेल्या रेशन दुकानदारांच्या १०० टक्के रेशनकार्ड तपासणी करण्यात येणार आहे़ तपासणीअंती दोष आढळला, अपहार झाल्याचे निष्पन्न झाल्यास तर त्यांचे कायमस्वरुपी परवाने रद्द करण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव यांनी सांगितले़ तपासणी करण्यात आलेल्या ११२ पैकी पुढील २९ जणांना अनामत रक्कम जमा करणे, परवाना निलंबित करणे अथवा रद्द करणे, तसेच फौजदारी स्वरुपाची कारवाई का करण्यात येवू नये, अशा स्वरुपाच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत़ यातील काही कारवाईच्या रडारवर आहेत़
पाच ते सहा जणांवर फौजदारी?
यात पाच ते सहा स्वस्त धान्य दुकानदारांनी पॉस मशीनव्दारे स्वत: बोटाचे ठशांव्दारे अन्न वितरीत करण्यात आले तसेच रेकार्डनुसार धान्य वितरीत झाले असताना धान्याचा साठा आढळून आले, अशा स्वरुपाचा अपहार केल्याचे तपासणी निष्पन्न झाले असून सुनावणीअंती त्यांच्या संबंधितांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे संकेतही पुरवठा अधिकारी जाधव यांनी दिले आहेत़
जिल्ह्यात नवीन १९८ रेशन दुकाने
शहरे, गावांचा विस्तार लक्षात घेता, जिल्ह्यात विविध ठिकाणी आणखी १९८ नवीनदुकानांबाबतजाहीरनामाप्रसिध्दकरण्यातआलाआहे़स्थानिकस्वराज्यसंस्था,स्वयंसेवीसंस्था,सहकारीसंस्था व नंतर बचतगट याप्रमाणेपात्र संस्थांनी अर्ज करावेत,असे आवाहनही करण्यात आले आहे़ मुलाखत प्रक्रिया बंद करण्यात आली असून समितीने अंतिम केलेल्या संस्था,अर्जदाराला परवाना देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले़