जळगाव मनपा निवडणूक : कामावर रुजू न होणारा एक कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:38 PM2018-07-26T12:38:44+5:302018-07-26T12:40:50+5:30

Suspending one employee not working | जळगाव मनपा निवडणूक : कामावर रुजू न होणारा एक कर्मचारी निलंबित

जळगाव मनपा निवडणूक : कामावर रुजू न होणारा एक कर्मचारी निलंबित

Next
ठळक मुद्देमतमोजणी केंद्राची पाहणी७० मतदार यंत्रे आढळली नादुरुस्त

जळगाव : मनपा निवडणुकीसाठी आचारसंहिता विभागात नियुक्ती करुनही कामावर रुजू न होणाऱ्या मनपाच्या हॉस्पिटल विभागातील शिपाई चंद्रशेखर बेलोरकर यांना निलंबित करण्याचे आदेश मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिले आहेत. तसेच निवडणुकीच्या कामांमध्ये दुर्लक्ष केल्यास कोणत्याही कर्मचाºयाला पाठीशी घातले जाणार नाही अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
मतमोजणी केंद्राची पाहणी
१ आॅगस्ट रोजी होणाºया मनपा निवडणुकीसाठी प्रशासनाकडून सुरु असलेल्या नियोजनाची बुधवारी मुख्य निवडणूक निरीक्षक प्राजक्ता लवंगारे यांनी आढावा घेतला. सकाळी काही मतदान केंद्रांना भेटी दिल्यानंतर दुपारी एमआयडीसी परिसरातील ई-सेक्टर ८ मधील मतमोजणी ठिकाणाला भेट दिली.
दरम्यान निवडणूक काळात मतदारांना आमीष देणे किंवा धमकाविण्याचे प्रकार वाढतात. सर्व निवडणुका या भयमुक्त व कोणत्याही गैरप्रकारात पार पडू नये यासाठी दक्षता घेण्याबाबतच्या सूचना पोलीसांना देण्यात आल्या. तसेच शहरातील हॉटेल्स रात्री उशीरापर्यंत उघड्या राहिल्यास तत्काळ कारवाई करण्याचा सूचना देखील लवंगारे यांनी दिल्या.मुख्य निवडणूक निरीक्षक प्राजक्ता लवंगारे यांनी शहरातील काही मतदान केंद्रांना भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे, उपायुक्त चंद्रकांत खोसे व लक्ष्मीकांत कहार हे उपस्थित होते.
७० मतदार यंत्रे आढळली नादुरुस्त
बुधवारी मतमोजणी ठिकाणावर मतदार यंत्राची चाचणी घेण्यात आली. यामध्ये ७० मतदान यंत्रामध्ये तांत्रिक त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून हे ७० मतदान यंत्रे बदलण्यात आली आहेत. निवडणुकीसाठी एकुण ५१७ मतदान यंत्राची आवश्यकता असून, मनपाने ऐनवेळी काही अडचण येवू नये म्हणून ५९६ मतदान यंत्रे तयार ठेवली आहेत.

Web Title: Suspending one employee not working

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.