दोघांमध्ये तिसऱ्याच्या एन्ट्रीचा संशय ; दोन प्रियकारांनीच संपविले दोन प्रेयसींना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 09:19 PM2019-11-21T21:19:08+5:302019-11-21T21:19:17+5:30
के-हाळा येथील दुहेरी खून प्रकरणाचा उलगडा : ३५ वर्षापासूनच्या प्रेमप्रकरणाचा रक्तरंजित अंत
जळगाव/ रावेर : आपली प्रेयसी आपल्याशी एकनिष्ठ नाही, दोघांत तिसºयाने एन्ट्री मारल्याचे संशयाचे भूत डोक्यात शिरले आणि नियोजनबध्द कट करुन आपआपल्या प्रेयसींना शेतात बोलावून दोघांनी दोघं प्रेयसीचा खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. शालुबाई गौतम तायडे (५७) व नशिबा गुलाब तडवी (४६) या दोन्ही महिलांच्या खुनाचा पोलिसांनी अवघ्या तीन तासातच उलगडा केला आहे.
लक्ष्मण किसन निकम (६२, रा. केºहाळे खुर्द,ता. रावेर) व कैलास गुना गाढे (६०, रा.केºहाळे बु., ता.रावेर) या दोघं प्रेमविरांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांनी ३५ वर्षापासूनच्या प्रेम प्रकरणाचा रक्तरंजीत अंत का व कसा केला याची माहिती पोलिसांना सांगितली. दरम्यान, दोघांना रावेर न्यायालयाने २५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, गुन्ह्यात वापरलेला चाकू पोलिसांनी हस्तगत केला आहे.
शालुबाई गौतम तायडे व नशिबा गुलाब तडवी या दोघं माहेरवाशीन मैत्रीणी सोमवारी सकाळी बकऱ्यांना चारा आणण्यासाठी खेडीच्या जंगलात गेल्या होत्या. दुपारी २ वाजेपर्यंत घरी परत न आल्याने त्याचा खेडीच्या जंगलात शोध घेतला असता त्या मिळून आल्या नाहीत. त्यामुळे दोघांच्याबाबतीत रावेर पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली. नातेवाईक व गावकरी खेडीच्या जंगलात शोध घेत असतांना मंगळवारी दुपारी साडे बारा वाजता विठ्ठल नारायण सोनवणे यांच्या शेतात शालुबाई तायडे हिचा तर थोड्या अंतरावर नारायण रामचंद्र पाटील यांच्या शेतात नशिबा तडवी हिचा मृतदेह आढळून आले. मृतदेहाची स्थिती पाहता हा खुनाचा प्रकार असल्याचे सिध्द झाले.
एस.पी. चालले दोन कि.मी.अंतर
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक डॉ .पंजाबराव उगले , अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके व अधिकाºयांचा ताफा व कर्मचारी घटनास्थळावर पोहचले. घटनास्थळ मुख्य रस्त्यापासून जंगलात असल्याने तेथे वाहन जावू शकत नव्हते. त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ.उगले व त्यांचा ताफा तब्बल दोन कि.मी.अंतर जंगलात रात्री चालत गेले. मृतदेहांची पाहणी केल्यानंतर घटनास्थळावरच तांत्रिक आधार घेऊन डॉ.उगले यांनी तपासाच्या सूचना केल्या आणि काही पुरावे हाती येताच तासाभरातच मारेकरी निष्पन्न करण्यात आले.
पंधरा मिनिटातच खणखणले फोन
गुन्हा उघडकीस आणण्याच्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम, सहायक निरीक्षक स्वप्नील नाईक, सहाय्यक फौजदार विनयकुमार देसले , नारायण पाटील, रामचंद्र बोरसे , विजय पाटील, नरेंद्र वारूळे , अनिल जाधव , अशरफ शेख , सुधाकर अंभोरे, दीपक शिंदे , दीपक छबु पाटील यांचे पथक दोन्ही केºहाळे गावात धडकले. या पथकातील प्रत्येकाने आपआपले मोबाईल क्रमांक जाहीर केले. त्यानंतर अवघ्या १५ मिनिटात अशरफ शेख यांच्या मोबाईलवर एका व्यक्तीने संपर्क साधून संशयित व्यक्तीचे नाव व कारणाची माहिती दिली. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ लक्ष्मण निकम व त्याचा मित्र कैलास गाढे या दोघांना ताब्यात घेतले. सुरुवातीला ‘मी नाही त्यातला’ ची भूमिका घेतली. खाकी हिसका दाखविताचा दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.
‘खूनापूर्वी केला दोघींवर अत्याचार
लक्ष्मण व कैलास या दोघांनी खून करण्यापूर्वी आपआपल्या प्रेयसीसोबत अत्याचार केला. शवविच्छेदन अहवालातही ते स्पष्ट झाले आहे, त्यामुळे खुनासह बलात्काराचेही कलम त्यात वाढविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कैलास याने नशिबाला तिचे अन्य कोणत्या केळी व्यापाºयाशी अनैतिक संबंध आहेत? याची माहिती काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नशिबा हीने त्याला स्पष्ट नकार दिल्याने त्याने तिला फाशी देत असल्याचा दम दिला. तिने प्रियकर असल्याने तो फाशी देवू शकत नाही म्हणून हो सांगितले. त्यावर कैलास याने फवारणी पंपाच्या पट्टयाच्या सहाय्याने तिला फाशी देण्याचा प्रयत्न केला.मात्र त्याच्या प्रेमाची दोरी पक्की असल्याने फाशीची दोरी तुटली. त्या झटापटीत ती उभी राहीली. मात्र, लगेच चक्कर येऊन पुन्हा खाली कोसळली, मात्र नंतर लक्ष्मण व कैलास अशी दोघांनी तिला मारलेच.
लक्ष्मण व शालुबाई दीड वर्षापासून तर शबिना व कैलास ३५ वर्षापासून संपर्कात
४लक्ष्मण याचे शालूबाई तायडे हिीच्याशी दीड वर्षांपासून प्रेमसंबंध जुळले होते. शालु हिचे देखील दुसºया व्यक्तीशी अनैतिक संबंध असावेत असा संशय लक्ष्मण यालाही होता. विशेष म्हणजे दोन्ही मैत्रिणी म्हणून त्यांचे प्रियकरही परस्परांचे मित्र बनले होते. काही दिवसांपासून नशिबा हीचे अन्य केळी व्यापाºयांशी संबंध असल्याचे लक्ष्मण याने कैलासला सांगितले होते. त्यामुळे कैलासच्या मनात आपली ३५ वर्षांपासूनची प्रेयसीने आपला आत्मघात केल्याची पक्की खुणगाठ बांधल्याने त्याने लक्ष्मण याच्या मदतीने नशिबाला संपवण्याचा घाट घातला. त्या अनुषंगाने सोमवारी कैलास याने नशिबा हिला शालु हिला सोबत घेऊन शेतात भेटण्यासाठी बोलावले.
सामुहिक प्रयत्नांनी हा गुन्हा उघड झाला. दोघांनी तपासात कारण सांगितले आहे, त्यात आणखी काही वेगळे कारण आहे का? याचीही चौकशी केली जात आहे. सर्व अधिकारी व कर्मचाºयांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याने गुन्हा उघड झाला.
-डॉ पंजाबराव उगले, पोलिस अधीक्षक,