जळगावात बांधकाम ठेकेदाराचा संशयास्पद मृत्यू
By admin | Published: June 3, 2017 02:31 PM2017-06-03T14:31:18+5:302017-06-03T14:31:18+5:30
बांधकाम ठेकेदाराचा शनिवारी सकाळी नवीन बसस्थानकाशेजारी असलेल्या महात्मा गांधी उद्यानात मृतदेह आढळून आला आहे.
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 3 - वीज बील भरण्यासाठी शुक्रवारी दुपारी घरुन निघालेल्या श्रावण भगीरथ राठोड (वय 45 रा. जळगाव, मुळ रा.लोखंडय़ा, मध्यप्रदेश) या बांधकाम ठेकेदाराचा शनिवारी सकाळी नवीन बसस्थानकाशेजारी असलेल्या महात्मा गांधी उद्यानात मृतदेह आढळून आला आहे. राठोड याच्या गळ्याला बारीक तारेचे व्रण असून तोंडातून फेस आलेला असल्याने हा घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की, श्रावण राठोड हे गेल्या 18 वर्षापासून प}ी सखुबाई, मुलगा योगेश, अजय, मुलगी आरती, वडील भगीरथ गमना राठोड, आई कलीबाई व भाऊ संतोष उर्फ गुड्ड असे एकत्र रामेश्वर कॉलनीत वास्तव्याला आहे. घराचे वीज बील भरायचे असल्याने शुक्रवारी दुपारी 4 वाजता ते दुचाकीने (क्र.एम.एच.19 सी.सी.3757) महावितरणच्या कार्यालयात गेले होते. नंतर ते घरी आलेच नाही. रात्रभर शोध घेतल्यानंतर शनिवारी सकाळी गांधी उद्यानात त्यांच्या मृतदेहच आढळून आला.