वाकोद येथील तरुणाचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 21:30 IST2020-12-26T21:28:28+5:302020-12-26T21:30:00+5:30
वाकोद, ता. जामनेर येथील युवक रविंद्र महाले याचा शनिवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास पहुर येथील एकुलती रस्त्यावर बेवारस अवस्थेत मृतदेह आढळून आला.

वाकोद येथील तरुणाचा संशयास्पद मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
वाकोद, ता. जामनेर : येथील युवक रविंद्र नामदेव महाले (२७) याचा शनिवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास पहुर येथील एकुलती रस्त्यावर बेवारस अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून मृत्यूचे कारण अद्याप समजलेले नाही.
याबाबत पहुर पोलिसात डॉ. सचिन वाघ यांच्या खबरीवरुन अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. रविंद्र महाले हा होतकरू होता. त्याचे वाकोद गावी जळगाव-औरंगाबाद महामार्गावर दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज होते. शनिवार बाजार असतानादेखील तो पहुर का गेला? हा प्रश्न समोर आला असून हा घातपात की आत्महत्या हा संशय येत आहे.
या घटनेबाबत वाकोद गावी चर्चेला उधाण आले असून महाले कुटुंबियांचा होतकरू मुलगा अचानक गेल्याने परिवारावर मोठे संकट कोसळले आहे. याबाबत पहुर पोलिसात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली असून रविंद्र महाले याचे प्रेत रात्री जळगाव येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहे.