तरुणासोबत गेलेल्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 04:52 PM2020-07-20T16:52:28+5:302020-07-20T16:54:41+5:30
गणपती नगरात भांडी घासत असताना एका तरुणासोबत गेलेल्या १६ वर्षीय तरुणीचा मृतदेह दुसºया दिवशी मेहरुण तलावात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळी जे.के.पार्कला लागून असलेल्या तलावात मृतदेह होता. एका हाताला ओढणी बांधलेली होती. हे प्रकरण संशयास्पद असल्याने मृत तरुणीच्या नातेवाईकांनी इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी विशाल अशोक भोई (२४, रा.रामेश्वर कॉलनी) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
जळगाव : गणपती नगरात भांडी घासत असताना एका तरुणासोबत गेलेल्या १६ वर्षीय तरुणीचा मृतदेह दुसºया दिवशी मेहरुण तलावात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळी जे.के.पार्कला लागून असलेल्या तलावात मृतदेह होता. एका हाताला ओढणी बांधलेली होती. हे प्रकरण संशयास्पद असल्याने मृत तरुणीच्या नातेवाईकांनी इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी विशाल अशोक भोई (२४, रा.रामेश्वर कॉलनी) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांबापुरात राहणारी तरुणी व तिची आई रविवारी सकाळी ११ वाजता गणपती नगरातील रोहीत मनोहरलाला नाथानी यांच्याकडे धुणीभांडी करायला गेले होते. तेथे काम करीत असताना नाथानी यांच्या घरासमोरच राहणाºया एका कुटुंबाने आजच्या दिवस धुणी भांडी करण्यासाठी तरुणीच्या आईला बोलावले. त्यामुळे आई तिकडे गेली. तेथील काम आटोपून परत नाथानी यांच्याकडे दुपारी दोन वाजता आली असता नाथानी यांची वहिणी नाशा नीलेश नाथानी यांनी मुलगी १२.३० वाजताच काहीही न सांगता काम अपूर्ण सोडून गेल्याच माहिती दिली. त्यामुळे घाबरलेल्या कुटुंबाने सर्वत्र शोधाशोध करुनही तरुणीची माहिती मिळाली नाही. त्यामुळे सायंकाळी ७.३० वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन अपहरणाचा गुन्हा दाखल झाला.
हाताला ओढणी बांधलेली
एकीकडे मुलीचा शोध सुरु असतानाच दुसरीकडे सोमवारी सकाळी सात वाजता जे.के.पार्कला लागून असलेल्या मेहरुण तलावात तरुणीचा मृतदेह आढळून आला. एका हाताला ओढणी होती. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. तेथे तरुणीच्या आई, वडीलांसह नातेवाईकांनी धाव घेतली. मुलीचा मृत्यूप्रकरणात त्यांनी इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी करुन तरुणीच्याबाबतीत संशय व्यक्त केला. या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली.