तरुणासोबत गेलेल्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 12:16 PM2020-07-21T12:16:23+5:302020-07-21T12:16:34+5:30

जळगाव : गणपती नगरात भांडी घासत असताना एका तरुणासोबत गेलेल्या १६ वर्षीय तरुणीचा मृतदेह दुसऱ्या दिवशी मेहरुण तलावात आढळून ...

Suspicious death of a young woman who went with a young man | तरुणासोबत गेलेल्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू

तरुणासोबत गेलेल्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू

Next

जळगाव : गणपती नगरात भांडी घासत असताना एका तरुणासोबत गेलेल्या १६ वर्षीय तरुणीचा मृतदेह दुसऱ्या दिवशी मेहरुण तलावात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळी जे.के.पार्कला लागून असलेल्या तलावात मृतदेह होता. एका हाताला ओढणी बांधलेली होती. हे प्रकरण संशयास्पद असल्याने मृत तरुणीच्या नातेवाईकांनी इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी विशाल अशोक भोई (२४, रा.रामेश्वर कॉलनी) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांबापुरात राहणारी तरुणी व तिची आई रविवारी सकाळी ११ वाजता गणपती नगरातील रोहीत मनोहरलाला नाथानी यांच्याकडे धुणीभांडी करायला गेले होते. तेथे काम करीत असताना नाथानी यांच्या घरासमोरच राहणाºया एका कुटुंबाने आजच्या दिवस धुणी भांडी करण्यासाठी तरुणीच्या आईला बोलावले. त्यामुळे आई तिकडे गेली. तेथील काम आटोपून परत नाथानी यांच्याकडे दुपारी दोन वाजता आली असता नाथानी यांची वहिनी नाशा नीलेश नाथानी यांनी मुलगी १२.३० वाजताच काहीही न सांगता काम अपूर्ण सोडून गेल्याच माहिती दिली. त्यामुळे घाबरलेल्या कुटुंबाने सर्वत्र शोधाशोध करुनही तरुणीची माहिती मिळाली नाही. त्यामुळे सायंकाळी ७.३० वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन अपहरणाचा गुन्हा दाखल झाला.
हाताला ओढणी बांधलेली
एकीकडे मुलीचा शोध सुरु असतानाच दुसरीकडे सोमवारी सकाळी सात वाजता जे.के.पार्कला लागून असलेल्या मेहरुण तलावात तरुणीचा मृतदेह आढळून आला. एका हाताला ओढणी होती. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. तेथे तरुणीच्या आई, वडीलांसह नातेवाईकांनी धाव घेतली. मुलीचा मृत्यूप्रकरणात त्यांनी इनकॅमेरा शवविच्छेदन करावे व तरुणीबाबत संशय व्यक्त केला. या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली.

एमआयडीसी पोलिसांकडून सीसीटीव्हीची तपासणी
- या गुन्ह्याचा तपास दोन पोलीस ठाण्यात विभागला गेला आहे. अपहरणाचा गुन्हा रामानंद नगरला तर अकस्मात मृत्यूची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे. हा गुन्हा वर्ग करण्यासंदर्भात एकमेकांकडे बोट दाखविण्याचे काम दिवसभर सुरु होते. मृत्यूबाबत संशय असल्याने एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक विनायक लोकरे, उपनिरीक्षक विशाल वाठोरे, सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, सचिन मुंडे, रतिलाल पवार, सचिन पाटील, योगेश बारी व भूषण सोनार यांनी घटनेला सुरुवात झाल्यापासून तर शेवट होईपर्यंतच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तरुणी रविवारी संध्याकाळी पावसात तलावाच्याकाठी असल्याचे काही जणांनी पाहिल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे.

तरुण-तरुणी एकमेकाच्या संपर्कात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी व विशाल दोघंही एकमेकाच्या संपर्कात होते. दोघं एकमेकांना चांगले ओळखतात. नाथानी यांच्या घरी तरुणीला भेटायला गेल्याबाबत विशाल याने पोलिसांकडे कबुली दिली आहे, मात्र त्यानंतर पुढे काय झाले माहिती नाही असे तो सांगत आहे.शवविच्छेदन अहवालात बºयाच प्रश्नांचा उलगडा होणार असल्याने पोलीस अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत.

Web Title: Suspicious death of a young woman who went with a young man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.