अयोध्या नगरातील तरुणाचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:13 AM2020-12-26T04:13:09+5:302020-12-26T04:13:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शिवाजीनगर परिसरातील रेल्वे स्टेशन आवारात असलेल्या दत्त मंदिराजवळ शुक्रवारी सकाळी ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह ...

Suspicious death of a youth in Ayodhya city | अयोध्या नगरातील तरुणाचा संशयास्पद मृत्यू

अयोध्या नगरातील तरुणाचा संशयास्पद मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शिवाजीनगर परिसरातील रेल्वे स्टेशन आवारात असलेल्या दत्त मंदिराजवळ शुक्रवारी सकाळी ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अनिल महेंद्रप्रताप शर्मा (रा. अयोध्या नगर) असे मयत तरुणाचे नाव असून, त्यास कुणीतरी मारहाण केली असावी, त्यातून त्याचा मृत्यू झाला असावा, असा संशय कुटुंबीयांनी वर्तविला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अनिल शर्मा हा अयोध्या नगरात कुटुंबीयांसह वास्तव्यास होता़ अंजिठा चौफुली येथे नाश्ताची गाडी लावून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करायचा. गेल्या आठ दिवसांपूर्वी तो घराबाहेर निघाला होता़ त्यानंतर पुन्हा घरीच परतला नाही. अखेर शुक्रवारी पहाटे अनिल याचा शिवाजी नगर परिसरातील रेल्वे स्टेशन आवारात नागरिकांना मृतदेह आढळून आला. परिसरातील रहिवासी विजय नाना बांदल यांना हा प्रकार कळताच, त्यांनी शहर पोलीस ठाण्यात संपर्क केला व शववाहिका बोलविली.

तीन तास मृतदेह पडून

रेल्वे स्टेशन आवारात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याचे कळताच, शहर पोलीस ठाण्यातील हवालदार संजय झाल्टे, प्रणेश ठाकूर, उमेश भांडारकर, रफीक पटेल यांनी घटनास्थळ गाठले; मात्र शववाहिकेला येण्यास उशीर झाल्यामुळे तब्बल तीन तास मृतदेह त्याठिकाणी पडून होता. साडेनऊ वाजताच्या सुमारास मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.

चेहरा पाहताच फोडला हंबरडा

शिवाजी नगरात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला असून, तो तरुण अयोध्या नगरातील असल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. अखेर मुलगा अनिल तर नाही, यासाठी शर्मा कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. मृतदेहाचा चेहरा पाहताच, तो मृतदेह अनिल याचा असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले व हंबरडा फोडला. चेहऱ्यावर मारहाण केल्याबाबतच्या खुणा असल्याचे सांगून कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनिल याच्या पश्चात आई-वडील, पत्नी दोन मुली व मुलगा असा परिवार आहे.

Web Title: Suspicious death of a youth in Ayodhya city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.