जळगाव जिल्ह्यात आजपासून संशयित रुग्ण शोध पंधरवाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 12:35 PM2020-06-24T12:35:00+5:302020-06-24T12:35:39+5:30

अ‍ॅपद्वारे अधिकाऱ्याचंी बैठक

Suspicious patient search fortnight in Jalgaon district from today | जळगाव जिल्ह्यात आजपासून संशयित रुग्ण शोध पंधरवाडा

जळगाव जिल्ह्यात आजपासून संशयित रुग्ण शोध पंधरवाडा

Next

जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबवायच्या उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्ह्यात २४ जून ते ८ जुलै या कालावधीत संशयित रुग्ण शोध पंधरवाडा राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील मृत्यूदर कमी होण्यासाठी या पंधरवाड्यात त्वरित निदान, त्वरित उपचार या तत्वावर रुग्णांवर आवश्यत ते उपचार करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.
प्रतिबंधात्मक उपयायोजनांचा आढावा घेण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांची अ‍ॅपद्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक झाली, त्या वेळी हा निर्णय घेणयात आला.
यासह जिल्ह्यात एका दिवसात एक हजार नमुने तपासण्याची व्यवस्था उभी केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले़ तसेच कोरोना योद्धांच्या अडचणी सोडविण्यासाठी कॉलसेंटरही सुरू करण्यात येणार आहे़

Web Title: Suspicious patient search fortnight in Jalgaon district from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव