भुसावळात १० ठिकाणी होणार स्वॅब टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 06:47 PM2020-07-08T18:47:26+5:302020-07-08T18:48:44+5:30
कोरोनाचा नायनाट व्हावा तसेच महिला वयोवृद्धांना कोविड केअर सेंटरला जाण्यासाठी त्रास कमी व्हावा याकरिता ४-५ कंटेनमेंट झोनसाठी एका ठिकाणी स्वॅब चाचणी होणार आहे.
भुसावळ, जि.जळगाव : शहरातील कोरोनाचा संपूर्ण नायनाट व्हावा तसेच महिला वयोवृद्धांना कोविड केअर सेंटरला जाण्यासाठी त्रास कमी व्हावा याकरिता ४-५ कंटेनमेंट झोनसाठी एका ठिकाणी स्वॅब चाचणी होणार आहे. यासाठी ९ ते २३ तारखेपर्यंत १० केंद्र निश्चित करण्यात आले आहे.
कोरोनाबाबत नागरिकांच्या मनातील भीती कमी व्हावी, त्यांची जवळच्या परिसरामध्ये स्वॅब टेस्ट व्हावी या लोकप्रतिनिधींच्या मागणीला प्रतिसाद देत आरोग्य विभागातर्फे शहरात १० केंद्रांवर वेगवेगळ्या तारखेला १० ठिकाणी चार ते पाच कंटेनमेंट झोनसाठी एक केंद्र निश्चित करण्यात आले आहे.
ठरलेल्या केंद्रात सकाळी ९ ते १२ नाव नोंदणी होईल. दुपारी १२ ते २ यावेळेस स्वॅब घेतला जाणार आहे.
९ जुलै रोजी तु झ.झोपे मेथाजी मळा, ११ रोजी शिवदत्त नगर, १३ रोजी मुस्कान हॉस्पिटल, १५ रोजी म्युनिसिपल हायस्कूल, १७ रोजी मराठा समाज मंदिर, १८ रोजी जुना सातारा नगरपालिका शाळा, २० रोजी डी.एल.हिंदी हायस्कूल, २१ रोजी एक्सेल हॉस्पिटल, २२ रोजी आदर्श हायस्कूल तर २३ रोजी महात्मा फुले नगरपालिका प्राथमिक आरोग्य केंद्र या १० केंद्रावर त्या- त्या जवळच्या कंटेनमेंट झोनमधील नागरिकांसाठी स्वॅब घेतला जाणार आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय अधिकारी डॉ.कीर्ती फलटणकर यांनी केले आहे.