विदेशातील ४५ लाखांची नोकरी सोडून दिला स्वदेशीचा नारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:37 AM2021-01-13T04:37:57+5:302021-01-13T04:37:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : विदेशात दोन पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्या ठिकाणी मिळणारी ४५ लाखांची नोकरी सोडून देशात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : विदेशात दोन पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्या ठिकाणी मिळणारी ४५ लाखांची नोकरी सोडून देशात परतून या ठिकाणीच व्यवसाय करण्याचा मानस मनाशी घेऊन आर्यन लक्ष्मीकांत मणियार या २३ वर्षीय उद्योजकाने एक वेगळा आदर्श समोर ठेवला आहे. आत्मनिर्भर इंडिया या अभियानाअंतर्गत या तरूणाने जळगावात फर्नीचर ही कंपनी सुरू केली आहे. आर्यन मणियार या युवा उद्योजकाचा युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रवास जाणून घेतला. तेव्हा त्याने ही माहिती दिली. फर्नीचरच्या या उद्योगात आता आधुनिक प्रणालीचा वापर दिसणार आहे.
घरात बसणारे फर्नीचर कसे असेल ही माहिती ऑनलाईन घेता येणार आहे. आत्मनिर्भर अभियान तुम्हाला स्वदेशी उद्योगांसाठी प्रोत्साहन देते. आपण ४५ लाखांची नोकरी सोडून भारत हा उद्योगात मोठी भरारी घेईलच हे चित्र डोळ्यासमोर ठेवून जे काही करायचे ते देशातच असे ठाम ठरवून देशातच आलो व व्यवसाय सुरू केला. कुटुंबाचा पाठिंबा मिळला. लहानपणापासूनच उद्योजक होण्याचे स्वप्न होते, असेही आर्यन मणियार याने सांगितले.
असे झाले शिक्षण
आर्यनचे प्राथमिक शिक्षण हे अनुभूती स्कूलमध्ये झालेले आहे. त्यानंतर मुंबई येथे पदवी घेतल्यानंतर एमबीए करण्यासाठी त्याने विदेश गाठले. स्पेन, युके या ठिकाणी त्याने आंतराष्ट्रीय व्यापार यात पदव्युत्तर शिक्षण मिळविले यासह मॅनेजमेंट इंटरप्रीनरशीप यातही पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.
हा दिला संदेश
बेरोजगारी ही माणसाच्या डोक्यात असते. शिकण्यासारखे खूप आहे, नवनवीन गोष्टी आत्मसात केल्यास काम करत राहिल्यास मार्ग सापडतात, केवळ एका गोष्टीच्या मागे न धावता पर्याय शोधून त्यावर काम केल्याने आवड जोपासल्याने यश हमखास मिळते, असा संदेश या युवा उद्योजकाने दिला आहे.
पासपोर्ट फोटो आहे