चाळीसगावला विद्यार्थ्यांसाठी ‘स्वाध्यायमालेचा’ प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 03:37 PM2019-08-07T15:37:42+5:302019-08-07T15:38:34+5:30
एकेकाळी शिक्षण प्रक्रियेत मानाचे स्थान असणारा ‘स्वाध्यायमाला’ हा प्रकार हद्दपार झाला आहे. अवांतर वाचनही हरविले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या एकूणच अभ्यासावर याचे अनिष्ट परिणाम दिसून येत आहे. हे चक्र भेदण्यासाठी चाळीसगाव शिक्षण संस्थेच्या मुला-मुलींच्या विद्यालयात स्वाध्यायमाला उपक्रम ९ रोजी क्रांतीदिनी दुपारी तीन वाजता सुरू होत आहे.
चाळीसगाव, जि.जळगाव : एकेकाळी शिक्षण प्रक्रियेत मानाचे स्थान असणारा ‘स्वाध्यायमाला’ हा प्रकार हद्दपार झाला आहे. अवांतर वाचनही हरविले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या एकूणच अभ्यासावर याचे अनिष्ट परिणाम दिसून येत आहे. हे चक्र भेदण्यासाठी चाळीसगावशिक्षण संस्थेच्या मुला-मुलींच्या विद्यालयात स्वाध्यायमाला उपक्रम ९ रोजी क्रांतीदिनी दुपारी तीन वाजता सुरू होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाची गोडी लागणार आहे.
आ.बं.विद्यालयात नेहमीच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांचा अभ्यास पाया पक्का करण्यासाठी सेमी इंग्रजी माध्यमाअंतर्गत गणित व शास्त्र विषयाची कार्यशाळादेखील घेण्यात येत आहे. याबरोबरच स्वाध्यायमाला व अवांतर वाचन मालिका उपक्रमाचेही उद्घाटन केले जाणार आहे.
माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी.जी.पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होत असून संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष नारायणदास अग्रवाल हे अध्यक्षस्थानी असतील. संस्थेचे संचालकवृंद हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे.
उपस्थितीचे आवाहन शाळा समितीचे चेअरमन अॅड.प्रदीप अहिरराव, मु.रा.अमृतकार व मुख्याध्यापक यांनी केले आहे.