फैजपूर येथे स्वामिनारायण गुरुकुलच्या विद्यार्थ्यांकडून पाणी बचतीची प्रतिज्ञा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 05:41 PM2019-05-03T17:41:52+5:302019-05-03T17:43:16+5:30

पाणी बचतीची प्रतिज्ञा व जलक्रांती अभियानास देगणी देवून श्री स्वामिनारायण गुरुकूलच्या विद्यार्थ्यांनी महाराष्टÑ दिन साजरा कला.

Swaminarayan Gurukul's students promise to save water at Faizpur | फैजपूर येथे स्वामिनारायण गुरुकुलच्या विद्यार्थ्यांकडून पाणी बचतीची प्रतिज्ञा

फैजपूर येथे स्वामिनारायण गुरुकुलच्या विद्यार्थ्यांकडून पाणी बचतीची प्रतिज्ञा

googlenewsNext
ठळक मुद्देलोकसहभागातून राबविले जातेय जलक्रांती अभियानविद्यार्थ्यांसह शिक्षकांनी जमविली रक्कम

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : पाणी बचतीची प्रतिज्ञा व जलक्रांती अभियानास देगणी देवून श्री स्वामिनारायण गुरुकूलच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट दिन साजरा कला.
येथील श्री स्वामिनारायण गुरुकुल संस्थेत पाणी बचतीचे महत्व व संत महात्म्य तसेच समाजातील सर्व जाती-धर्मांचे पदाधिकारी व लोकसहभागातून जलक्रांती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानासाठी गुरुकुलच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी खारीचा वाटा उचलून तब्बल २१८४६ रुपये रक्कम जमा केली. घराघरात पाणी बचतीचे महत्व आपल्या आई-वडिलांसह नातेवाईकांना समजावून देण्याची प्रतिज्ञा घेऊन पाणी बचतीचा संदेश देण्याचा निर्धार केला आहे. खऱ्या अर्थाने हाच महाराष्ट्र दिन म्हणून त्यांनी साजरा केला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शास्त्री भक्तीप्रकाश दासजी यांनी महाराष्ट्र दिनाचे महत्त्व सांगून भविष्यात येणाºया पाणी समस्येवर महत्त्व विशद केले.
पाणी अडवा पाणी जिरवा म्हणजे बिंदू अमृताचा या योजनेसाठी संस्थेने समाजातील सर्व व्यक्ती व संस्थांकडून योजना राबविण्याची माहिती शास्त्री भक्तीप्रकाश दासजी यांनी दिली. जलक्रांती अभियानासाठी गुरुकुलच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी तसेच इतर कर्मचाऱ्यांनी योगदान दिले आहे त्यासाठी सर्वांचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.

Web Title: Swaminarayan Gurukul's students promise to save water at Faizpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.