माता-पित्याच्या स्मरणार्थ साकळी गावास दिला स्वर्गरथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:12 AM2021-06-25T04:12:56+5:302021-06-25T04:12:56+5:30
चुंचाळे, ता. यावल : जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती रवींद्र पाटील यांनी पिता व आईंच्या ...
चुंचाळे, ता. यावल : जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती रवींद्र पाटील यांनी पिता व आईंच्या स्मरणार्थ साकळी गावास स्वर्गरथ भेट दिला. फैजपूर येथील महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्वर्गरथाचे लोकार्पण करण्यात आले.
सामाजिक समरसता हे गावाचे वैभव असून गावातील सर्वधर्मजातींचे मन मजबूत होणे गरजेचे आहे. गावाची गरज ओळखून गावास स्वर्गरथ लोकार्पण करणेही ही बाब समाजाप्रती फार व्यापक दृष्टिकोन सांगून जाणारी आहे, असे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी मनोगतातून सांगितले. गावास स्वर्गरथ लोकार्पण केल्याबद्दल रवींद्र पाटील यांचे कौतुकही केले.
यावेळी हभप जळकेकर महाराज, हभप अंकुश महाराज, विहिंपचे पूर्णवेळ कार्यकर्ते धोंडू माळी, मधुकर शिंपी यांच्या हस्ते पूजा करून करण्यात आले. रवींद्र पाटील यांच्या हस्ते संत-महंतांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक गणेश गिरधर नेहेते, यावल बाजार समितीचे माजी संचालक विलास पाटील, साकळीचे उपसरपंच वसीमखान, ग्राम पंचायत सदस्य साहेबराव बडगुजर, शरद बिऱ्हाडे, दिनकर माळी, खतीब तडवी यांच्यासह ग्रामपंचायतीचे माजी सदस्य दीपक पाटील, सै.अहमद सै.मीरा, मुसेखाँ पठाण, नूतनराज बडगुजर, राजू सोनवणे, विलास काळे, विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन निंबादास पाटील, पांडुरंग निळे, रामकृष्ण खेवलकर, सूर्यभान बडगुजर, किसन महाजन, भिका पाटील, शेख सलिमभाई, भाजयुमोचे यावल तालुका उपाध्यक्ष योगेश खेवलकर, राजू जंजाळे, अशोक जंजाळे, विलास पवार, नितिन फन्नाटे, ज्ञानेश्वर मोते, बंटी बडगुजर, आत्माराम तेली, भागवत रावते यांच्यासह विविध पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.