साकळी येथे पिसाळलेल्या माकडाचा धुमाकूळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:18 AM2021-08-15T04:18:32+5:302021-08-15T04:18:32+5:30

याबाबत अधिक माहिती अशी की, गावात गेल्या काही दिवसांपासून एका पिसाळलेल्या माकडाने थैमान घातलेले आहे. हे माकड गावात ...

A swarm of monkeys scattering here in the morning! | साकळी येथे पिसाळलेल्या माकडाचा धुमाकूळ!

साकळी येथे पिसाळलेल्या माकडाचा धुमाकूळ!

Next

याबाबत अधिक माहिती अशी की, गावात गेल्या काही दिवसांपासून एका पिसाळलेल्या माकडाने थैमान घातलेले आहे. हे माकड गावात ज्या भागात जाईल त्या भागातील गुरा-ढोरांच्या मागे लागून त्यांना बोचकण्यासह चावाही घेत आहे. त्यामुळे ढोरे गंभीर जखमी होत आहेत. या माकडाने एखाद्या मोकळ्या फिरत असलेल्या गायीवर अथवा गो-ह्यावर हल्ला चढविला तर ही ढोरे माकडाच्या भीतीने दिसेल त्या रस्त्याने सैरावैरा पळतात. अशा वेळी या पळणाऱ्या ढोरांमध्ये कोणी लहान मुले, महिला, वयोवृद्ध व्यक्ती आल्यास त्यांचा जीवही जाऊ शकतो एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. या माकडाच्या दहशतीमुळे गावातील नागरिक खूप धास्तावले आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये शनि मंदिर भागातील वसंत काशिनाथ बडगुजर, पवन रवींद्र बडगुजर, श्रावण भिका बडगुजर, ग्रा.पं. सदस्य साहेबराव बडगुजर, किशोर बडगुजर, बापू मराठे, भगवान बाबुराव बडगुजर या ग्रामस्थांच्या गुराढोरांवर या माकडाने हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले आहे. दरम्यान, पंचायत समिती सदस्य दीपक पाटील यांनीही यावल वन विभागाशी संपर्क साधून पिसाळलेल्या माकडाचा त्वरित बंदोबस्त करण्यासंदर्भात सांगितले आहे.

जखमी झालेल्या सर्व गुरा-ढोरांवर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज पाटील तसेच डॉ.वाय.जी. नेवे यांनी उपचार केले आहे. दरम्यान, या माकडाचा बंदोबस्त करण्यासाठी लगेचच कर्मचाऱ्यांना साकळी येथे पाठवतो, असे यावल वनविभागाचे अधिकारी विशाल कुटे यांनी नागरिकांना कळविले आहे.

Web Title: A swarm of monkeys scattering here in the morning!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.