१९७८ मध्ये स्वातंत्र्य चौकाचे नामकरण, १९९० ला उभारला सावरकरांचा पुतळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:22 AM2021-02-26T04:22:43+5:302021-02-26T04:22:43+5:30
जळगाव : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदार सावरकर यांचा आज स्मृती दिन आहे. सावरकर यांचा जळगाव शहरातील स्वातंत्र्य चौकात असलेला ...
जळगाव : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदार सावरकर यांचा आज स्मृती दिन आहे. सावरकर यांचा जळगाव शहरातील स्वातंत्र्य चौकात असलेला पुतळा ही शहराची एक वेगळी ओळख बनली आहे. १९९० मध्ये महात्मा गांधी उद्यानात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा उभारण्यात आला होता. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, तत्कालीन विरोधी पक्ष नेते मनोहर जोशी, आमदार सुभाष देसाई, तत्कालीन नगराध्यक्ष व आमदार सुरेशदादा जैन यांच्या उपस्थितीत या पुतळ्याचा अनावरण सोहळा झाला होता. तशी कोनशिलाही तेथे लावण्यात आली होती.
१९७८ मध्ये झाले होते स्वातंत्र्यचौकाचे नामकरण
स्वातंत्र्य चौकाची खरी ओळख ही सावरकर पुतळ्याजवळील वळणावर गांधी उद्यानाच्या कुंपणभिंतीलगत शहरातील स्वातंत्र्य सैनिकांच्या नावांच्या कोनशिलांमुळे निर्माण झाली. या चौकात स्वातंत्र्य शिला स्थापना व स्वातंत्र्य चौक नामकरण समारंभ ८ मार्च १९७८ रोजी हुतात्मा भगवान भुसारी यांच्या कन्या पारूताई वाघ यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी स्वातंत्र्यसैनिक देवकीनंदन चक्रवर्ती होते. तर नगरपालिकेचे अध्यक्ष स.ना. भालेराव होते. त्या सगळ्यांच्या नावाची कोनशिला सावरकर पुतळ्याच्या चबुतऱ्याजवळच आहे.