चाळीसगाव येथे ‘स्वयंसिध्दा’ अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 07:18 PM2019-01-19T19:18:47+5:302019-01-19T19:20:49+5:30
चाळीसगाव येथील यशवंतराव चव्हाण कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व महाविद्यालयातील विद्यार्थी कल्याण विभागांतर्गत युवती सभेतर्फे विद्यार्थिनींसाठी १४ ते २१ पर्यंत स्वयंसिध्दा अभियान राबविण्यात येत आहे.
चाळीसगाव, जि.जळगाव : येथील यशवंतराव चव्हाण कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व महाविद्यालयातील विद्यार्थी कल्याण विभागांतर्गत युवती सभेतर्फे विद्यार्थिनींसाठी १४ ते २१ पर्यंत स्वयंसिध्दा अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर. जाधव यांनी केले. मनोगतात त्यांनी विद्यार्थिनीां स्वावलंबी व सुसंस्कारीत व्हावे व नवराष्ट्र निमार्णामध्ये योगदान द्यावे, असे आवाहन केले. याप्रसंगी विचारमंचावर उपप्राचार्या डॉ.एस. व्ही. साखला, विद्यार्थी कल्याण विभागप्रमुख प्रा. डॉ.जी.बी.शेळके, प्रा. डॉ.अनिता नाईक, प्रा.ए. एल. कुलकर्णी, प्रा.डॉ.रेखा पाटील, प्रा.पी. एस.पाडवी, प्रा.निमा गोल्हार, प्रा.मंगला सूर्यवंशी उपस्थित होते.
प्रास्ताविक युवती सभाप्रमुख प्रा. डॉ.यु.आर.मगर यांनी केले. प्राचार्य डॉ. एस. आर. जाधव यांनी कराटे प्रशिक्षक छोटू चौधरी व दीपक सेनवणे यांचे स्वागत केले. या अभियानात महाविद्यालयातील विद्यार्थिनींना कराटे व स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या अभियानात १२५ विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला आहे.