‘मातृवंदने’तून मातांचा गौरव करणारे मधुर संस्कार केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2017 07:16 PM2017-05-14T19:16:33+5:302017-05-14T19:16:33+5:30

‘मधुर संस्कार केंद्रा’च्या माध्यमातून समस्त मातांमध्ये मातृवंदना कार्यक्रमात मी माङया आईला शोधत असतो,

The sweet ritual center that honors mothers from 'Mother Earth' | ‘मातृवंदने’तून मातांचा गौरव करणारे मधुर संस्कार केंद्र

‘मातृवंदने’तून मातांचा गौरव करणारे मधुर संस्कार केंद्र

googlenewsNext

पंढरीनाथ गवळी / ऑनलाइन लोकमत

भुसावळ, जि. जळगाव, दि. 14 - पूज्य साने गुरुजी आणि आदिवासी शिक्षक स्व. आमद दिलदार नहाड यांच्या प्रेरणेतून आकारास आलेल्या ‘मधुर संस्कार केंद्रा’च्या माध्यमातून समस्त मातांमध्ये मातृवंदना कार्यक्रमात मी माङया आईला शोधत असतो, अशी भावना यावल येथील सेवानिवृत्त शिक्षक व मधुर संस्कार केंद्राचे प्रमुख पी. आर. पाटील यांनी व्यक्त केली.
मातृदिनाच्या पाश्र्वभूमीवर बोलताना ते म्हणाले की, लहान असतानाच माझी आई वारली. मी अनाथ झालो, नंतर वडीलही वारले.  यादरम्यान पूज्य साने गुरुजी आणि माङो शिक्षक आमद दिलदार नहाड यांच्या प्रेरणेतून माझी आई मधुर यांच्या नावाने 1985 मध्ये मधुर संस्कार केंद्र सुरू केले.
2004 पासून मधुर संस्कार केंद्रातर्फे ‘मातृवंदना’ हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. आतार्पयत 13 कार्यक्रम यशस्वीपणे पार पडले. अशा कार्यक्रमांमधून  जिल्ह्यातील  यशस्वी मातांचा गौरव करून त्यांना वंदन करण्यात येते. यात माझी आई मी शोधत असतो, असे पी.आर.पाटील म्हणाले.
हे आहे खरे मातृप्रेम
मातृवंदना, मातृभक्ती नेमकी कशात आहे, याचा याची देही याची डोळा अनुभव घेतलेले पाटील म्हणाले की, मधुर संस्कार केंद्रातर्फे दरवर्षी आदिवासी वस्ती, पाडय़ांवर जाऊन  दिवाळी साजरी केली जाते. एके वर्षी मी आंबापाणी येथे गेलो असता मला तेथे मुक्काम करावा लागला. सकाळी मला एका आदिवासी व्यक्तीने चहासाठी बोलावले. मी त्यांच्या झोपडीवजा खोपटीत शिरलो. तेथे तो आदिवासी बांधव त्याच्या वृद्ध आईला ताटातून चहा पाजत होता. शेजारी त्याची प}ी होती. मात्र तिला त्याने हात लावू दिला नाही; हेच आमच्या मातृवंदनाचे खरे प्रतीक  आहे, अशी भावना ते व्यक्त करतात. मातृप्रेमाची परवड थांबावी, यासाठी प्रय} सुरू आहेत, असेही ते म्हणाले.
आईला शोधून दु:ख हलके करण्याचा प्रय}
सलग 13 वर्षे मातृवंदना कार्यक्रमात सहभागी मातांमध्ये मी माङया आईला शोधून माङो दु:ख हलके करण्याचा प्रयत्न करीत असतो, अशी भावना पी.आर. पाटील यांनी व्यक्त केली.
वेतनातील 10 टक्के रक्कम केंद्रासाठी
शिक्षक व्यवसायातून मिळणा:या वेतनातील दर महिन्याला 10 टक्के रक्कम मधुर केंद्रासाठी आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिली जात होती. यामागेदेखील आईची ममता होती, असे ते सांगतात.

Web Title: The sweet ritual center that honors mothers from 'Mother Earth'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.