बंधूरायाच्या संक्रांतीला पुरणपोळीचा गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 04:58 PM2020-01-15T16:58:58+5:302020-01-15T16:59:51+5:30

आपल्या अंध भावजयीला संक्रांतीचे गोड-धोड रांधण्यास अडचणीचे आहे. म्हणून चाळीसगाव तालुक्यातील खेर्डे येथील आपल्या भावासाठी भडगाव तालुक्यातील बात्सर येथून पुरणपोळीचा बेत बनवून त्यांची संक्रांत गोड करण्यासाठी धडपडणारी बहीण आज 'लोकमत’च्या दृष्टीपथास आली.

Sweeten the burial of the brotherhood | बंधूरायाच्या संक्रांतीला पुरणपोळीचा गोडवा

बंधूरायाच्या संक्रांतीला पुरणपोळीचा गोडवा

googlenewsNext
ठळक मुद्देबहिण असावी तर अशीअंध भावजयीच्या जाणिवेतून ती दूरकोसावारील भावासाठी गेली धावून

संजय हिरे
खेडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : आपल्या अंध भावजयीला संक्रांतीचे गोड-धोड रांधण्यास अडचणीचे आहे. म्हणून चाळीसगाव तालुक्यातील खेर्डे येथील आपल्या भावासाठी भडगाव तालुक्यातील बात्सर येथून पुरणपोळीचा बेत बनवून त्यांची संक्रांत गोड करण्यासाठी धडपडणारी बहीण आज 'लोकमत’च्या दृष्टीपथास आली.
घटना तशी वरवर पाहता साधी आहे. पण त्या मागची भावना जगाच्या पाठीवर बहीण-भावाच्या नात्यातील गोडवा कसा पुरणपोळी सारखा असावा याची शिकवण देणारी आहे.
आज पहाटे बात्सर फाट्यावर साठीतील एक महिला ताईबाई उर्फ ताराबाई चैत्राम अहिरे ही आपल्याला वाहन कसे लवकर मिळेल? यासाठी आतूर झालेली होती. चौकशीअंती उलगडलेली कहानी अशी- चाळीसगाव तालुक्यातील खेर्डे येथील लहू भावसिंग सोनवणे या आपल्या भावासाठी पुरणपोळी, सार-भात असा बेत बनवत त्यांची संक्रात गोड व्हावी म्हणून तिने तिकडे धाव घेतली होती. भावजयीस अर्थात पाठचा भाऊ लहू याच्या पत्नीस अकाली अंधत्व आल्याने मागील संक्रांतीपासून ती सणावारास भावाकडे जात आहे. सणावारास गोडधोड खायला मिळावे ही अंतरीची तळमळ त्यामागे आहे. यासाठी भल्या पहाटे दोनला उठून चुलीवर खापर ठेवत पुरणपोळी, सारभात सर्व काही आपल्या हाताने रांधत ती भावाकडे जाण्यासाठी दिवस उजाडायला फाट्यावर तयार होती. भावाबहिणींचे हे प्रेम सणावारापुरतेच मर्यादित नाही, तर भावाच्या दु:ख सुखात ती धावून जाते. शेतमजुरी, हातावरच पोट असूनही भाऊ-भावजयीच्या आजारपणात अंगावरील किडूक-मिडूक मोडून भावांसाठी व त्यांच्या संसारासाठी खस्ता खाणाऱ्या या बहिणीचे प्रेम पाहिल्यानंतर गरीबीतही भावा-बहिणींच्या नात्यातील ही श्रीमंती आजच्या तकलादू नातेबंधनास लाजवणारी नक्कीच ठरते.
पाठना भावसेस साठे
खेर्डे येथील या आदिवासी भिल्ल समाजातील सोनवणे कुटुुंंबातील लहू-अंकूश हे दोन भाऊ. पैकी लहान अंकूश उसतोडणीला देशावर गेलेला आहे. मोठा लहू पत्नीच्या अंधत्वामुळे घरीच शेती सांभाळतो. अनेकांनी दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला. मात्र तोही एक पत्नीनिष्ठ म्हणून त्याने ठोकरला. दोन भावांच्या पाच बहिणी. त्या भावापेक्षा मोठ्या आहेत. पैकी तीन बात्सर येथे राहतात. तिघीही पन्नासी पलीकडे. सुना व नातवंडे घरात. तरीही भावांमधे जीव गुंतलेला. पाठना भावसेस... साठे वाटेल ते कष्ट उपसण्यास त्या मागे वसरत नाहीत. यावर्षी अतिवृष्टीमुळे खेर्डे येथील भावाच्या शेतात मोठ्या प्रमाणात तण झाले. भावाला बैलाने मारल्याने पासोळी मोडली म्हणून दवाखान्यात. बहिणींनी पै-पै जमवून मदत केली. एवढ्यावरच थांबल्या नाहीत. निंदणीसाठी हाती खुरपे घेत त्या बात्सर येथून खेर्डे येथे भावाच्या शेतावर गेल्यात. तिघींनी आठवडाभरात तीन बीघे बाजरीतले तण काढले. पाठी भाऊ असावा. अशा त्या तोंडभरुन म्हणतात तेव्हा नात्यातला ओलावा डोळ्यातून उतरल्याशिवाय राहत नाही. भावा-बहिणींचे हे प्रेम पाहिल्यानंतर नात्यातील अहंपणाच्या साखळ्या आपोआप गळून पडतात.
 

Web Title: Sweeten the burial of the brotherhood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.