परदेशी कुटुंबाच्या केळीचा गोडवा परदेशात पोहोचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:12 AM2021-06-20T04:12:36+5:302021-06-20T04:12:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भडगाव : तालुक्यातील वाडे परिसर केळी ...

The sweetness of a foreign family's banana reached abroad | परदेशी कुटुंबाच्या केळीचा गोडवा परदेशात पोहोचला

परदेशी कुटुंबाच्या केळीचा गोडवा परदेशात पोहोचला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

भडगाव : तालुक्यातील वाडे परिसर केळी बागायती पिकासाठी प्रसिद्ध आहे. परिसरात भरपूर प्रमाणात केळीची लागवड केली जाते. अनेक शेतकरी, केळी पिकाची लागवड करून दरवर्षी चांगला मळा फुलवतात. येथील केळीचा दर्जा चांगल्या प्रतीच्या असल्याने ती राज्यभरासह देशभरात प्रसिद्ध आहे. अकलूज येथील रॉयल फ्रेश बनाना या कंपनीने वाडे येथील शेतकरी पद्मसिंग शांतीलाल परदेशी, विजयसिंग आणि संजय शांतीलाल परदेशी यांच्या मालाची प्रतवारी पाहून तो माल इराण व अफगाणिस्तानाला नुकताच योग्य पॅकिंग करून पाठवला आहे. मालाची पॅकिंगसाठी कंपनीचेच कामगार पश्चिम बंगालमधून आणण्यात आले आहेत. मालाची प्रतवारी पाहून खासगी व्यापारी, बाजारभावापेक्षा ५०० ते ६०० रुपये जास्त मिळत आहे.

वाडेसह गिरणा भागात केळी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. अनेक शेतकरी चांगल्या नियोजनाने, मेहनतीने केळी पिकाचा मळा फुलवितात. वाडे येथील

पद्मसिंग, विजयसिंग आणि संजयसिंग परदेशी हे तिघे भाऊ मिळून सव्वादोन एकरात ३५०० एक्याचे केळीची खोडाची लागवड केली आहे. आतापर्यंत ११०० खोडाची कापणी झाली आहे. त्यामध्ये आतापर्यंत ३ लाख ५० हजार रुपये उत्पन्न निघाले आहे. अजून २४०० खोड बाकी आहे. पूर्ण सव्वादोन एकरात १० ते ११ लाखांचे उत्पन्न निघेल, अशी तिघे भावांची अपेक्षा आहे. त्यांचे योग्य नियोजन मेहनतीला मोठे यश आले आहे.

आधुनिक पद्धतीने शेती केली तर ती परवडतेच, परंतु त्यासाठी निसर्गाचीदेखील साथ लागते. त्यात मोठे भाऊ विजयसिंग (ओझर, ता. चाळीसगाव) येथे प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत तर लहान भाऊ पदमसिंग हे शेती सांभाळून मोसंबीचा व्यापार करत आहेत. त्यांचा नेहमी आधुनिक शेती व वेगवेगळ्या प्रकारची पिके लावण्याचा प्रयत्न असतो. मागच्यावर्षी टोमॅटोचे एक एकरात तीन लाखाचे उत्पन्न काढले. तसेच टरबूज पिकाचेसुद्धा ४ महिन्यात एका एकरात दोन लाखाचे उत्पन्न काढले. त्यांचे नेहमी शेतकऱ्यांना एकच उपदेश असतो. आपण शेतीमध्ये कमी पडायचे नाही.

शेती परवडत नाही; परंतु मी विजयसिंग परदेशी व माझा लहान भाऊ पदमसिंग परदेशी आधुनिक पद्धत आणि मेहनत यांचा योग्य प्रकारे वापर केला तर शेती परवडते, असे या शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

या केळी कापणीविषयी आम्हाला विलास पाटील पंढरपूर, अभिजित चव्हाण, ऋषीकेश वाघ, रविराज वाघ, रोहित वाघ (अकलूज) यांनी सहकार्य केले.

===Photopath===

190621\19jal_4_19062021_12.jpg

===Caption===

वाडे येथील केळीचा माल गाडीत पॅकींग करतेवेळी शेतकरी विजयसिंग परदेशी, पदमसिंग परदेशी.

Web Title: The sweetness of a foreign family's banana reached abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.