प्रसन्नता आणि तंदुरुस्तीसाठी ‘स्विमिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 09:24 PM2019-11-21T21:24:23+5:302019-11-21T21:24:42+5:30

आरोग्य : थंडीची चाहूल लागल्याने जलतरण तलावांमध्ये लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत गर्दी

'Swimming' for happiness and fitness | प्रसन्नता आणि तंदुरुस्तीसाठी ‘स्विमिंग’

प्रसन्नता आणि तंदुरुस्तीसाठी ‘स्विमिंग’

Next

जळगाव : धावपळीच्या जीवनात आणि त्यात कामाच्या ताणतणावाचा शरीरावर नकळत परिणाम होत असतो. किरकोळ व्याधी वाढत असतात. काम करण्याची इच्छा होत नाही. या सर्वांवर जर मात करायची असेल तर दररोज पोहायला जा. अत्यंत सोपा आाणि शरीराच्या सर्व अवयवांची हालचाल करणारा हा व्यायाम आहे. दिवसभर प्रसन्न राहण्यासाठी आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रत्येकाने ‘स्विमिंग’ करा. असा सल्ला गेल्या ३० ते ४० वर्षांपासून बाराही महिने स्विमिंगला जाणाऱ्या नागरिकांतर्फे देण्यात येत आहे.
गेल्या आठवडाभरापासून शहर आणि परिसरात थंडीचे प्रमाण वाढल्याने शहरातील विविध ठिकाणच्या जलतरण तलावांमध्ये लहानांपासून ते ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी दिसून येत आहे.
मेहरुण येथील कोळीळ गुरुजी जलतरण तलाव, जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव, एकलव्य क्रीडा मैदानावरील जलतरण तलाव, गणेश कॉलनीतील गीताशंकर जलतरण तलाव व पोलीस लाईनमधील जलतरण या ठिकाणी पहाटे साडेपाच पासूनच पोहण्यासाठी नागरिक येत आहेत. शारिरीक स्वास्थासाठी हिवाळा हा ऋतू महत्वाचा मानला जात असल्याने, आपल्या पालकांसोबत बच्चे कंपनीदेखील विविध जलतरण तलावांत पोहतांना दिसून आली.
विशेष म्हणजे एकलव्य जलतरण तलाव, कोकीळ गुरुजी जलतरण तलाव या ठिकाणी ५ ते १२ वर्ष वयोगटातील मुलासांठी स्वतंत्र पोहण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे लहान मुलेही याचा लाभ घेताना दिसून येत आहे.

४पोहण्यामुळे दिवसभर मन प्रसन्न राहते, थकवा जाणवत नाही. विशेष म्हणजे कामाच्या व्यापांमुळे मानसिक तणाव येत नाही.
४पोहण्यामुळे शरिराच्या सर्व मांसपेशी व अवयवांची हालचाल होते.यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो.
४ज्या लोकांना कंबरदुखी, पाठदुखीव गुडघेदुखीचा त्रास आहे, अशांना पोहण्यामुळे या आजारांपासून आराम मिळतो. उतारपण असले तरी, थकवा जाणवत नाही.
४कुठल्याही ऋतूत सर्दी, पडसे , खोकला हे किरकोळ आजारदेखील होत नाही. पोहण्यामुळे शरिर चपळ होऊन, रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
४शरिराची त्वचा तेज होते, तसेच वजनही लवकर कमी होते.
४ज्या व्यक्ती संधिवाताच्या दुखण्यामुळे व्यायाम करु शकत नाहीत, अशा व्यक्तींना पोहणे हा व्यायाम फायदेशिर ठरतो.
 

Web Title: 'Swimming' for happiness and fitness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.