जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव पुन्हा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:48 AM2021-01-08T04:48:33+5:302021-01-08T04:48:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जलतरण तलाव पुन्हा एकदा बंद झाला आहे. ठेकेदाराकडे थकबाकीची रक्कम वाढल्याने क्रीडा संकुल समितीने ...

Swimming pool at District Sports Complex closed again | जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव पुन्हा बंद

जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव पुन्हा बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जलतरण तलाव पुन्हा एकदा बंद झाला आहे. ठेकेदाराकडे थकबाकीची रक्कम वाढल्याने क्रीडा संकुल समितीने हा जलतरण तलाव ताब्यात घेत बंद केला. करारानुसार या ठेकेदाराला अद्याप थकबाकीची जवळपास साडेनऊ लाख रुपये भरता आले नसल्याने हा तलाव तात्पुरता बंद करण्यात आला आहे.

जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव तयार झाल्यापासून सातत्याने वादात सापडला आहे. या आधी तलावातच बुडून मृत्यू झाल्याने काही वर्षे हा तलाव बंद होता. त्यानंतर आधीच्या जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी हा तलाव मोठ्या प्रयत्नाने सुरू केला. दीड वर्षे हा तलाव नीट सुरू राहिला. मात्र कोरोनाच्या काळात लागलेल्या लॉकडाऊनमुळे हा तलाव पुन्हा बंद झाला. आता क्रीडा कार्यालय आणि ठेकेदारात वाद सुरू झाला आहे.

कोरोनाच्या काळात हा जलतरण तलाव उन्हाळ्यातच बंद होता. जिल्हा क्रीडा संकुलाच्या ठेकेदाराकडे जवळपास नऊ लाखांच्या वर रक्कम बाकी आहे. त्यात कोविडच्या काळातील रक्कम कपात करण्यात आली आहे.

ठेकेदाराकडून कराराचे पालन नाही

जिल्हा क्रीडा कार्यालयाने या ठेकेदाराकडून तीन वर्षांपासून बाकी

असल्याची माहिती आहे. त्याचा करार जून २०२१पर्यंत आहे. मात्र नियमीतपणे

पैसे भरलेले नाही. ठेकेदाराला या आधीदेखील पैसे भरण्यासंदर्भात नोटीस

दे्ण्यात आल्या होत्या. मात्र बाकी खूप वाढली आहे. त्यामुळे सध्या जलतरण

तलाव बंद करण्यात आले. शहरातील इतर प्रमुख जलतरण तलाव सुरू

सध्या शहरातील पोलीस जलतरण सुरू आहे. त्यामुळे बहुतांश जलतरणपटू त्या तलावावर सराव करण्यासाठी जात आहेत. शहरात सर्व गटात मिळून १०० च्यावर राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय खेळाडू आहे. आता नजीकच्या काळात त्यांच्या स्पर्धादेखील सुरू होऊ शकतात. त्यामुळे या खेळाडूंना सरावाची आवश्यकता आहे.

कोट -

ठेकेदाराला वारंवार सांगूनही त्याने थकबाकीच रक्कम भरलेलीच नाही. यात कोरोनाच्या काळातील रक्कम कपात करण्यात आली आहे. थकबाकी ही त्या आधीची आहे. त्यामुळे तलाव बंद आहे. थकबाकी भरल्यास तलाव सुरू करण्यात येईल - मिलिंद दीक्षित, जिल्हा क्रीडा अधिकारी

Web Title: Swimming pool at District Sports Complex closed again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.