केºहाळे येथे स्वाईन फ्ल्यूचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 06:15 PM2018-10-06T18:15:09+5:302018-10-06T18:15:58+5:30

हभप रघुनाथ बाबूराव पाटील (५८) यांचे ६ रोजी रात्री स्वाईन फ्ल्यूच्या लागणमुळे औरंगाबाद येथील एका रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. आठ दिवसांपूर्वी घरी अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारार्थ निमोनियासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले. तब्येतीत सुधारणा होत नसल्याने स्वाईन फ्ल्यूच्या लागणची तपासणी केली. तपासणीमध्ये लागण झाल्याचे निष्पन्न झाले. परंतु डॉक्टरांनी अथक प्रयत्न करूनसुद्धा त्यांना वाचविण्यात यश आले नाही.

Swine Flu victim at K. Hale | केºहाळे येथे स्वाईन फ्ल्यूचा बळी

केºहाळे येथे स्वाईन फ्ल्यूचा बळी

Next
ठळक मुद्देहळहळ : गायनाचार्य रघुनाथ पाटील दगावले४० वर्षांपासून वारकरी संप्रदायाला घेतले होते वाहून


केºहाळे, ता.रावेर, जि.जळगाव : येथील हभप रघुनाथ बाबूराव पाटील (५८) यांचे ६ रोजी रात्री स्वाईन फ्ल्यूच्या लागणमुळे औरंगाबाद येथील एका रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.
आठ दिवसांपूर्वी घरी अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारार्थ निमोनियासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले. तब्येतीत सुधारणा होत नसल्याने स्वाईन फ्ल्यूच्या लागणची तपासणी केली. तपासणीमध्ये लागण झाल्याचे निष्पन्न झाले. परंतु डॉक्टरांनी अथक प्रयत्न करूनसुद्धा त्यांना वाचविण्यात यश आले नाही.
गायनाचार्य रघुनाथ पाटील यांनी सुमारे ४० वर्षांपासून वारकरी सांप्रदायाला स्वत:ला वाहून घेतले होते. यामुळे परिसरातील भजनी मंडळ व सांप्रदायातील लोकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांची परिसरात पोकळी निर्माण झाली आहे.

‘केºहाळे येथील रघुनाथ पाटील यांचा मृत्यू स्वाईन फ्लूमुळे झाल्याचा अहवाल आला आहे. त्यानुसार, कुटुंबियांना प्रतिबंधात्मक औषधांचा पुरवठा वाघोड प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे जावून देण्यात आला आहे.’
-डॉ.चंद्रकांत पाटील, आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, वाघोड, ता.रावेर />


 

Web Title: Swine Flu victim at K. Hale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.