ेवाळू डंपरच्या व्यवहारातून तरुणावर तलवार हल्ला

By admin | Published: January 17, 2017 12:29 AM2017-01-17T00:29:38+5:302017-01-17T00:29:38+5:30

मोहाडी रस्त्यावरील घटना : एक दिवस आधीही जुगार अड्डय़ावर वाद

Sword Attack on the Young Dump | ेवाळू डंपरच्या व्यवहारातून तरुणावर तलवार हल्ला

ेवाळू डंपरच्या व्यवहारातून तरुणावर तलवार हल्ला

Next

जळगाव : वाळू डंपरच्या व्यवहाराच्या कारणावरुन सचिन भानुदास भोळे (वय 28 रा.नेहरु नगर, जळगाव) या तरुणावर रविवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास तलवार हल्ला झाला. या हल्ल्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी गिरीष राक्षे, दिनेश मधुकर भोई याच्यासह अन्य दोन अशा चौघांविरुध्द सोमवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमी सचिन याचे मेहुणे भूषण महाजन व गिरीष राक्षे तसेच देसाई यांच्यात डंपरच्या व्यवहारातून वाद आहेत. गेल्या वर्षी औद्योगिक वसाहतीमधील रेमंड चौकात झालेल्या अपघातात हे डंपर जमावाने पेटविले होते. त्यात झालेले नुकसान व व्यवहार यावरुन तिघांमध्ये वाद होता. यात तोंड खूपसू नको असे म्हणत या चौघांनी सचिन याला रविवारी रात्री बेदम मारहाण केली. राक्षे याने त्याच्या डोक्यावर तलवारीने हल्ला केला. त्याला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून चौघांनी तेथून पळ काढला. यानंतर मयुर वाघ या मित्राने सचिनला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सोमवारी उपनिरीक्षक रोहन खंडागळे व संतोष सोनवणे यांनी त्याचा रुग्णालयात जबाब नोंदविला.
हल्लेखोर फरार
सचिन व हल्लेखोर यांचा यापूर्वी शिरसोली रस्त्यावर असलेल्या जुगार अडय़ावरही वाद झाला होता. दोन दिवस या वादाची धूसफूस सुरु होती. त्यातून रविवारी ही मोठी ठिणगी पडली. शिरसोली रस्त्यावर भूषण महाजन यांचे स्टोन क्रशर आहे. दरम्यान, यातील हल्लेखोरांना अद्याप अटक झालेली नाही ते  फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Sword Attack on the Young Dump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.