चाळीसगावला निघाली महाविकास आघाडी सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:19 AM2021-07-07T04:19:48+5:302021-07-07T04:19:48+5:30

चाळीसगाव : सोमवारी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षणावरून चांगलेच रणकंदन माजले. यात गैरवर्तन केले म्हणून भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन ...

Symbolic funeral procession of Mahavikas Aghadi government started at Chalisgaon | चाळीसगावला निघाली महाविकास आघाडी सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

चाळीसगावला निघाली महाविकास आघाडी सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

Next

चाळीसगाव : सोमवारी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षणावरून चांगलेच रणकंदन माजले. यात गैरवर्तन केले म्हणून भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन केले गेले. याचा निषेध म्हणून येथे सायंकाळी सात वाजता सिग्नल चौकात प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.

सायंकाळी साडेसात वाजता सिग्नल चौकातून महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक अंत्ययात्रेला सुरुवात झाली. यावेळी ‘राम बोलो भाई राम’ या आवाजाने हा परिसर चांगलाच दणाणून गेला. सिग्नल चौकातच ही अंत्ययात्रा पोलिसांनी रोखली. अंत्ययात्रेचे सर्व सामान ताब्यात घेतले. या निषेध आंदोलनात भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रा. सुनील निकम, शहराध्यक्ष व नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, पं. स.चे भाजपा गटनेते संजय भास्कर पाटील, पालिकेचे गटनेते संजय रतनसिंग पाटील, नगरसेवक चंद्रकांत तायडे, अरुण अहिरे, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, सदानंद चौधरी, जितेंद्र वाघ, किशोर रणधीर, योगेश खंडेलवाल, नीलेश राजपूत आदी सहभागी झाले होते.

Web Title: Symbolic funeral procession of Mahavikas Aghadi government started at Chalisgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.