थंडी वाढताच केळीवर ‘करपा’ची लक्षणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 05:04 PM2020-01-05T17:04:14+5:302020-01-05T17:06:42+5:30
दोन दिवसांपासून चिनावल व परिसरातील केळी पट्ट्यात थंडीची बऱ्यापैकी चाहुल लागल्याने केळी बागांवर करपा सदृश्य रोगाची लक्षणे दिसू लागली आहेत.
चिनावल, ता.रावेर, जि.जळगाव : गेल्या दोन दिवसांपासून चिनावल व परिसरातील केळी पट्ट्यात थंडीची बऱ्यापैकी चाहुल लागल्याने केळी बागांवर करपा सदृश्य रोगाची लक्षणे दिसू लागली आहेत. थंडीतील करपा व चरकामुळे केळी बागांचे मोठे नुकसान होते. पर्यायाने केळी उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होते. यासाठी उत्पादकांनी प्राथमिक अवस्थेतच काळजी घेण्याचे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले आहे.
गेल्या दोन दिवसापासून थंडी बºयापैकी पडत आहे. चिनावलसह कुंभारखेडा, वाघोदा, विवरा, वडगाव, लोहारा, सावखेडा परिसरात नवती केळी बागांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. सद्य:स्थितीत हा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आहे. केळी बागांमधील केळीच्या पानांवर लाल तांबूस आकाराचे छोटे छोटे ठिपके दिसू लागले आहे. केळी पानांच्या कडा करपू लागले आहे. येणाºया काही दिवसात थंडीचे प्रमाण वाढल्यास करप्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. यासाठी केळी उत्पादकांनी आतापासूनच करपाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहत.
उत्पादकांनी आपले केळीबाग आणि शेताचे बांध शक्यतो तणमुक्त ठेवावे. पाणी साचून राहणार नाही याची दक्षता शेतकऱ्यांनी घ्यावी. पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात होईल याकडे लक्ष द्यावे. केली बागेत आर्द्रतेचे प्रमाण कमी असावे यासारख्या प्राथमिक बाबींवर उत्पादकाने लक्ष दिल्यास करपा रोगावर नियंत्रण होऊ शकते. करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याआधीच कृषी विभागाने उत्पादकांना आवश्यक ते औषधे फवारणीचे मार्गदर्शन करावे व कृषी विभागामार्फत शेतकºयांना औषधी पुरवाव्यात, अशी मागणी उत्पादकांकडून होत आहे.
करपा रोगाने केळी ३० टक्क्यांपेक्षा जास्त करपली असल्यास हे पान काढून नष्ट करावे. रोगाची प्राथमिक लक्षणे दिसताच क्लोरथलोनील २ ग्रॅम कार्बेन्डाझिम, मेक जॉब किंवा कॉपर आॅक्सिक्लोराईड ग्रॅम पाण्यात फवारणी करावी. अन्नद्रव्यांची मात्रा वेळेनुसार द्यावी. फवारणी शक्यतो सकाळी करावी. यासारख्या सुरक्षा घेतल्यास करपा रोगावर नियंत्रण होऊ शकते, असे अनुभवी व परिसरातील कृषी तज्ज्ञांचे मत आहे.