वृद्धेच्या मृत्यूनंतर महिन्याने यंत्रणा अलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 11:54 AM2020-07-10T11:54:07+5:302020-07-10T11:54:16+5:30
तीन गेटवर तीन सुरक्षा रक्षक : आत-बाहेर जाणाऱ्यांवर वॉच, आणखी उपाययोजना सुरु
जळगाव : कोविड रुग्णालयात मालती नेहते या महिलेचा शौचालयात मृतदेह आढळून आल्याच्या घटनेला १० रोजी महिना होत आहे़ महिनाभराच्या कालावधी प्रचंड मोठ्या घडामोडी घडल्या, सुरक्षा यंत्रणेचे पुन्हा काही घटनांवरून वाभाडे निघाले, मात्र, महिनाभराच्या कालावधीने अखेर यंत्रणा अलर्ट झाली असून आता प्रत्येक आत -बाहेर ये-जा करण्याऱ्यांवर सुरक्षा रक्षकात तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून वॉच ठेवला जात आहे़ स्वच्छता निरीक्षक नेमण्यात आले असून त्यावरही विशेष नियंत्रण आहे़
डीन कार्यालयाकडून कक्ष एक कडे जाण्याच्या मार्गात गेट बसविण्यात आले आहे़ या गेटवर एक सुरक्षा रक्षक तैनात आहे़ शिवाय मुख्य प्रवेशद्वारावर दोन त्यानंतर रुग्णालयात आत जाण्यासाठीचे गेट सुरक्षा रक्षक बंदच करून ठेवत असतात़ यानंतर कक्ष ७ कडे जाताना दोन सुरक्षा रक्षक कायम बसलेले असतात़ आता कक्षात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. शिवाय १२ स्वच्छतागृहांचे दरवाजे तुटलेले होते़ ते बसविण्यात आले आहेत़
वृद्ध सापडला पाचोºयात... जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या पहिल्याच भेटीच्या दिवशी नगरदेवळा येथील एक संशयित वृद्ध रुग्णालयातून निघून गेल्याचा प्रकार समोर आला होता़ ही घटना लक्षात येताच सर्व कर्मचाºयांनी आधी सर्व स्वच्छतागृहे व वॉर्ड तपासले होते़ अखेर सीसीटीव्हीच्या माध्यमातून हा रुग्ण बाहेर गेल्याचे दिसले होते व दुसºया दिवशी हा रुग्ण पाचोरा येथे आढळून आला होता़ तेव्हाही सुरक्षा यंत्रणेचे वाभाडे निघाले होते़
स्वच्छता निरीक्षकही आले... आठ दिवस महिलेचा मृतदेह रुग्णालयात पडूनही तो सापडला नव्हता, दुर्गंधी आल्यानंतर ही घटना समोर आली. त्यावेळी स्वच्छता निरीक्षक हे पदच रिक्त असल्याने स्वच्छतेच्या बाबतीत नियंत्रणच नव्हते मात्र, दोन ते तीन दिवसांपूर्वी या पदावर सुरेश भालेराव यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियंत्रणाखाली ही स्वच्छतेची कामे नियमित होत असल्याचे सांगितले जात आहे़ महापालिकेडून त्यांची नियुक्ती झाल्याची माहिती आहे़
जिल्हाधिकाºयांच्या तंबीनंतर बदल
- महिलेच्या मृत्यूच्या घटनेनंतर अनेक बदल झाले, मात्र, स्थानिक पातळीवर सुरक्षा व्यवस्था सतर्क नसल्याचे चित्र वारंवार समोर आले होते़ रुग्णांना जागेवरच सुविधा मिळण्यास अडचणी होत होत्या़ मात्र, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी थेट सुरक्षा कंपनीचा ठेका रद्द करण्महिनाभरात
काय बदलले?
1) जिल्हाधिकारी, अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक
2) सर्व कक्षांमध्ये सीसीटीव्ही कार्यान्वयीत झाले
3) महिनाभरानंतर बेड साईड असिस्टंट नियुक्त झाले
4) सुरक्षा यंत्रणा अधिक सक्रिय झाल्याचे चित्र
5) जिल्हाधिकाºयांच्या वारंवार पाहणीमुळे यंत्रणा सतर्क
6) तीन नवीन गेट, प्रत्येक गेटवर एक सुरक्षा रक्षक
7) प्रत्येक रुग्णाला ओळख पटावी म्हणून ड्रेसकोड लागू.
8) १२ स्वच्छतागृहांचे तुटलेले दरवाजे बसविण्यात आले आहेत. याचा इशारा दिला होता, त्या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरा दिवसांपासून ही यंत्रणा अधिक सतर्क असल्याचे चित्र आहे़