शिवाजीनगर उड्डाणपुलाचा टी आकाराचा आराखडा केवळ ठेकेदाराच्या फायद्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:16 AM2021-05-08T04:16:38+5:302021-05-08T04:16:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाचा टी आकाराचा आराखडा चुकीचा असून, यामुळे या भागातील नागरिकांना ...

The T-shaped layout of Shivajinagar flyover is for the benefit of the contractor only | शिवाजीनगर उड्डाणपुलाचा टी आकाराचा आराखडा केवळ ठेकेदाराच्या फायद्याचा

शिवाजीनगर उड्डाणपुलाचा टी आकाराचा आराखडा केवळ ठेकेदाराच्या फायद्याचा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाचा टी आकाराचा आराखडा चुकीचा असून, यामुळे या भागातील नागरिकांना कोणताही फायदा होणार नसून हा आराखडा केवळ ठेकेदाराचा फायद्यासाठी तयार करण्यात आल्याची तक्रार शिवसेनेचे शिवाजीनगर भागाचे विभाग प्रमुख विजय बांदल यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. सद्यस्थितीत ज्या आकारात हा पूल तयार होत आहे. त्याच आकारात हा पूल तयार करण्यात यावा अशीही मागणी बांदल यांनी केले आहे.

शिवाजीनगर उड्डाणपूल तयार होण्याचा अगोदरच आता या पुलावरून राजकारण चांगलेच तापत आहे. टी व एल आकारावरून शिवाजीनगरात दोन गट पडले आहेत. एका गटाकडून हा पूल एल आकारात करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. तर दुसऱ्या गटाकडून हा पूल टी आकारात करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. शिवसेनेचे विभागप्रमुख विजय बांदल यांनी महापौर जयश्री महाजन यांनादेखील निवेदन सादर केले आहे.

Web Title: The T-shaped layout of Shivajinagar flyover is for the benefit of the contractor only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.