भुसावळ तालुक्यातील 12 जि़प़शाळांमध्ये टॅब्लेट एज्युकेशन
By Admin | Published: April 25, 2017 12:32 PM2017-04-25T12:32:20+5:302017-04-25T12:32:20+5:30
भुसावळ तालुक्यातील 12 शाळांमध्ये विद्याथ्र्याना टॅब्लेटद्वारे संगणकाचे धडे दिले जात असल्याने विद्यार्थी खरे अर्थाने हायटेक होण्यास मदत झाली आह़े
भुसावळ,दि.25- खाजगी शाळांच्या तुलनेत जि़प़शाळांचा दर्जा घसरला अशी नेहमीच टीका होत असताना भुसावळ तालुका मात्र त्यास अपवाद ठरला आह़े बदलत्या तंत्रज्ञानाची कास धरत तालुक्यातील 12 शाळांमध्ये विद्याथ्र्याना टॅब्लेटद्वारे संगणकाचे धडे दिले जात असल्याने विद्यार्थी खरे अर्थाने हायटेक होण्यास मदत झाली आह़े
पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या प्रयत्नांनी जि़ प़ शाळा ख:या अर्थाने कात टाकत असून त्यांची डिजिटल तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी यशस्वी वाटचाल सुरू आह़े गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या संकल्पनेतून भुसावळ तालुक्यातील जि़प़शाळांमध्ये टॅब्लेट एजुकेशन या नावीन्यपूर्ण उपक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले आह़े
सहभागी शाळा व कंसात टॅब्लेटची संख्या अशी-
जि़प़शाळा कठोरा खु.।। (दोन), जि़प़शाळा खंडाळे (एक), जि़प़शाळा फुलगाव (दोन), जि़प़शाळा मोंढाळे (एक), जि़प़शाळा मिरगव्हाण (एक), जि़प़शाळा निंभोरा (एक), जि़प़शाळा दीपनगर (दोन), जि़प़शाळा सिद्धेश्वरनगर-वरणगाव (एक), जि.प.शाळा पिंप्रिसेकम (एक), जि़प़शाळा जोगलखोरी (एक), जि़प़़ शाळा सुसरी (एक), जि़प़ शाळा तळवेल बॉइज (एक)़