तहसीलदार झाले उपजिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 09:55 PM2020-01-21T21:55:09+5:302020-01-21T21:55:19+5:30
४ जणांना पदोन्नती : जिल्हाधिकारी कार्यालयात होते कार्यरत
जळगाव- नुकतीचं शासनाकडून राज्यातील काही तहसिलदारांना उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती देण्यात आली असून त्यामध्ये जळगावजिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत ४ तहसिलदारांचा समावेश आहे़
सोमवारी शासनाकडून तहसिलदार संवर्गातून उपजिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती देण्याबाबतचे आदेश काढण्यात आले आहे़ त्यात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखा विभागातील बाबासाहेब गाढवे यांची अकोदा उपजिल्हाधिकापदी तर संजय गांधी योजना विभागातील तहसिलदार सुभाष दळवी यांची यवतमाळ उपजिल्हाधिकारी म्हणून तसेच शरद मंडलिक यांना नांदेड जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे़ त्याचबरोबर माणिक आहेर यांची बीड उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती दिली आहे़ दरम्यान, पदोन्नतीनंतर संबंधित अयधिकारी पदावर रूजू न झाल्यास, त्यांना पदोन्नती स्वारस्य नसल्याचे समजून सामान्य प्रशासन विभागाच्या स्थायी आदेशानुसार निवडसूचीतून त्यांचे नाव वगळ्यात येईल, असेही शासना आदेशात म्हटले आहे़
़
तहसीलदार झाले उपजिल्हाधिकारी
४ जणांना पदोन्नती : जिल्हाधिकारी कार्यालयात होते कार्यरत
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव- नुकतीचं शासनाकडून राज्यातील काही तहसीलदारांना उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती देण्यात आली असून त्यामध्ये जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत ४ तहसिलदारांचा समावेश आहे़