नशिराबादला तहसीलदारांनी केली रेशन दुकानांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 09:47 PM2020-04-09T21:47:43+5:302020-04-09T21:49:46+5:30
नशिराबाद, जि. जळगाव : जिल्ह्यात अनेक ठिकाणी रेशन धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी आहे. त्या पार्श्वभूमीवर नशिराबाद येथील रेशनिंग धान्य ...
नशिराबाद, जि. जळगाव : जिल्ह्यात अनेक ठिकाणी रेशन धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी आहे. त्या पार्श्वभूमीवर नशिराबाद येथील रेशनिंग धान्य दुकानांना तहसीलदार वैशाली हिंगे यांनी दुपारी अचानक भेट देऊन दप्तराची तपासणी केली.
दरम्यान याप्रसंगी तहसीलदारांना रेशन धान्य मिळत नसलेल्या रेशनकार्डधारकांनी व्यथा मांडली. याप्रसंगी सरपंच विकास पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश महाजन, अरुण भोई, भूषण कोल्हे यांच्यासह उपस्थित नागरिक व रेशनकार्ड धारकांनी श्रीराम पेठ चौकात तहसीलदारांना रेशन धान्य मिळत नसल्याच्या बाबतीत समस्यांचा पाढा वाचला.
गावात सुमारे अडीच ते तीन हजार रेशन कार्डधारक धान्यापासून वंचित आहे असल्याची माहिती याप्रसंगी सरपंच विकास पाटील यांनी दिली.
शासनाचे मोफत धान्य वाटप कधी होणार याविषयी चर्चा झाली. गावातील रेशन धान्य दुकानदारांकडून रेशनधारकांना मिळणाऱ्या वागणुकीबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या. तहसिलदारांनी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण केले.