पॅँटच्या खिशातील पैशासह गळ्यातील मंगलसूत्र लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 07:44 PM2017-09-24T19:44:01+5:302017-09-24T19:48:02+5:30
शौचालयाचे डक उघडून चोरट्यांनी घरात प्रवेश करुन खुंटीला टांगलेल्या पॅँटच्या खिशातील पगाराचे साडे सहा हजार रुपये तर पत्नीच्या गळ्यातील १६ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र व तीन मोबाईल असा ३९ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना एसएमआयटी कॉलेज रोड परिसरातील हनुमान मंदिराजवळ राहणाºया श्रीराम शांताराम गोडसे यांच्या घरात घडली आहे. १५ सप्टेबर रोजी झालेल्या या चोरीप्रकरणी रविवारी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२४ : शौचालयाचे डक उघडून चोरट्यांनी घरात प्रवेश करुन खुंटीला टांगलेल्या पॅँटच्या खिशातील पगाराचे साडे सहा हजार रुपये तर पत्नीच्या गळ्यातील १६ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र व तीन मोबाईल असा ३९ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना एसएमआयटी कॉलेज रोड परिसरातील हनुमान मंदिराजवळ राहणाºया श्रीराम शांताराम गोडसे यांच्या घरात घडली आहे. १५ सप्टेबर रोजी झालेल्या या चोरीप्रकरणी रविवारी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, श्रीराम गोडसे हे गणेश कॉलनीतील निर्मल प्रोव्हीजन या किराणा दुकानात कामाला आहेत. १५ सप्टेबर रोजी पत्नी शुभांगी व मुले जेवण झाल्यानंतर रात्री झोपून गेले. पहाटे साडे चार वाजता गोडसे यांना जाग आली असता घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी खुंटीला टांगलेली पॅँट पाहिली असता ती गायब झाली होती. या पँटच्या खिशात साडे सहा हजार रुपये होते तर पत्नीच्या गळ्यातही १६ हजार रुपये किमतीचे सात ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र होते ते देखील गायब झालेले होते. शेजारी ठेवलेले १० हजार रुपये किमतीचे तीन मोबाईलही जागेवर नव्हते.त्याच वेळी पत्नी व मुलांना झोपेतून उठविले असता त्यांनीही इतरत्र शोधाशोध केली. चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर ९ दिवसांनी गोडसे यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला तक्रार दिली.