मतिमंद मुलीवरील अत्याचारप्रकरणी दोषींवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 04:52 PM2018-10-05T16:52:14+5:302018-10-05T16:53:46+5:30
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील मतिमंद मुलीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी जलद गतीने न्यायालयात न्याय देऊन दोषींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी तालुक्यातील कुºहे ( पानाचे ) येथील सूर्यवंशी बारी पंच मंडळातर्फे प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर व तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले.
भुसावळ, जि.जळगाव : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील मतिमंद मुलीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी जलद गतीने न्यायालयात न्याय देऊन दोषींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी तालुक्यातील कुºहे ( पानाचे ) येथील सूर्यवंशी बारी पंच मंडळातर्फे प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर व तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले.
संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथे एका १८ वर्षीय मतिमंद मुलीवर गावातील ४५ वर्षीय नराधमाने अत्याचार केला होता. घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन या नराधमाने रॉकेल मागण्याचा बहाणा करून घरात प्रवेश केला व हे कृत्य केले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र या गुन्ह्याचा जलदगतीने तपास करून जलद गतीने न्याय मिळावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पीडित मुलीला न्याय मिळण्यासाठी व आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी जळगाव येथील प्रसिद्ध वकील अॅड.उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .
पीडित कुटुंबास ५० लाख रुपये मदत केली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे. राज्यात अतिशय अल्प असलेल्या या समाजाला न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
निवेदनावर बारी पंच मंडळाचे अध्यक्ष सुरेश बुधा बारी, यशवंत लक्ष्मण बनसोडे, उपसरपंच वासुदेव वराडे, माजी सरपंच रवींद्र वराडे, माजी उपसरपंच रवींद्र नागपुरे, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण नागपुरे, प्रमोद उंबरकर, माजी सदस्य किशोर वराडे, भगवान नागपुरे, बंडू वराडे, शिवाजी विकास सहकारी सोसायटीचे संचालक भरत नारायण वराडे, विजय दगडू वराडे, सुनील विठ्ठल वराडे, विश्वनाथ नारायण वराडे, प्रवीण आस्वार, शरद रामा वराडे, संतोष तेलंगे, गोपाळ आस्वार, विकास आस्वार, परशुराम काटोले, शशिकांत लक्ष्मण वराडे, मनोज वराडे, हैबत बारी, लक्ष्मण शंकर बारी, माधव कौतिक बारी, अमोल सुरेश वराडे, संतोष कालू बारी, संजय रंडाळे, किरण नागपुरे, संदीप वराडे, गुणाजी वराडे, दीपक उत्तम बारी, अभिजित नागपुरे, त्र्यंबक बोबडे, समाधान विठ्ठल वराडे, राजकुमार वराडे, राहुल वराडे, भावेश शिवाजी वराडे आदींच्या सह्या आहेत.