रूग्णवाहिका देण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 11:21 PM2019-12-17T23:21:21+5:302019-12-17T23:23:22+5:30
रूग्णवाहिका देण्यास टाळाटाळ करणाऱ्या दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
बिडगाव, ता.चोपडा, जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या कुंड्यापाणी या आदिवासी गावात प्रसुतीसाठी रूग्णालयात न्यायला १०२ क्रमांकावर वारंवार फोन करूनही रूग्णवाहिका न आल्याने गरोदर महिला वेळेवर रूग्णालयात न पोहचल्यामुळे तिचे बाळ दगावल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली होती. यामुळे येथील संतप्त मयत मुलाचे वडील व आदिवासी संघटनेने जिल्हाधिकाºयांना लेखी निवेदन देत रूग्णवाहिका देण्यास टाळाटाळ करणाºयांंची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
कुंड्यापाणी हे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले आदिवासी गाव आहे. येथील नफिसा शकील तडवी (वय २३) ही तरूण महिला पहिल्या प्रसूतीपूर्व वेदनांनी क१६ रोजी सकाळी विव्हळत होती. सातपुड््यच्या पायथ्याथी असलेल्या या छोट्याशा गावात आरोग्याविषयी कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने पुढील उपचारासाठी धानोरा गाठावे लागते व हे गाव येथून आठ कि.मी.आहे. त्यातही रस्ता खूप खराब असल्याने रूग्णवाहीका उपलब्ध व्हावी म्हणून नातेवाईकांनी १०२ या क्रमांकावर वारंवार संपर्क साधला. मात्र तब्बल दोन तास उडवाउडवीची उत्तरे मिळाली व रूग्णवाहिका आलीच नाही. शेवटी वेदना वाढतच गेल्याने नातेवाईकांनी रिक्षाने या गरोदर महिलेस सकाळी १०:३० वाजता धानोरा प्राथमिक आरोग्य केद्रात नेले होते. मात्र आधीच जास्त वेळ झाली व वेळेवर गाडी न मिळाल्याने खराब रस्त्याने रिशात आठ कि.मी रूग्णास नेल्याने तिची तब्येत अधिक खालावली. त्यामुळे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.उमेश कवडीवाले यांनी तिला पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठवले होते. तेथे डॉक्टरांनी तिची प्रसूती केली. मात्र वेळेवर रूग्णालयात न पोहचल्याने बाळ दगावल्याची दुर्दैर्वी घटना सोमवारी घडली होती. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिध्द केले होते. त्यामुळे घटना समोर आल्याने मंगळवारी मयत बाळाचे वडील शकील नामदार तडवी व आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच या संघटनेचे जिल्हाध्यक्ष जहांगीर महंमद तडवी यांनी उपजिल्हाधिकारी कदम यांना देऊन आदिवासी महिलेस रूग्णवाहिकेसाठी ताळकटत ठेऊन मुलाला गमवल्याची गंभीर घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. यावेळी खर्डी येथील प्रकाश पाटील यांच्यासह पदाधिकारीही उपस्थित होते. निवेदनावर कुंड्यापाणी ग्रामस्थ व संघटनेच्या पदाधिकाºयांच्या सह्या आहेत.