अनधिकृत बेसमेंटवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:16 AM2021-01-03T04:16:38+5:302021-01-03T04:16:38+5:30

जळगाव - शहरातील बेसमेंटचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याचा सूचना महापौर भारती सोनवणे यांनी मनपा प्रशासनाला दिल्या आहेत. ...

Take action on unauthorized basements | अनधिकृत बेसमेंटवर कारवाई करा

अनधिकृत बेसमेंटवर कारवाई करा

Next

जळगाव - शहरातील बेसमेंटचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याचा सूचना महापौर भारती सोनवणे यांनी मनपा

प्रशासनाला दिल्या आहेत. बेसमेंटचा अवैध वापर करणाऱ्यांबाबत ‘लोकमत’ ने गेल्या आठवड्यात वृत्त प्रसिद्ध केले होते. याच वृत्ताची दखल

घेत महापौरांनी मनपा प्रशासनाला आदेश दिले आहेत. तसेच नगररचना व अतिक्रमण निर्मूलन विभागाने याबाबत पूर्ण तपासणी व सुनावणी

प्रक्रिया देखील पूर्ण करण्याची सूचनाही महापौरांनी दिल्या आहेत.

उमेदवारांना घेऊन देवदर्शन

जळगाव -ग्रामपंचायत निवडणुकीची अर्ज भरण्याची मुदत आता संपली असून, ४ रोजी माघार घेता येणार आहे. यासाठी आता अनेकांकडून

मनधरणी सुरू झाली आहे. तर अनेक पॅनल प्रमुख आपले उमेदवार घेऊन देवदर्शनाला निघाले आहेत. ४ पर्यंत आपल्या उमेदवारांना राखून

ठेवण्यासाठी पॅनल प्रमुखांनी ही शक्कल लढविली आहे.

मक्या पाठोपाठ ज्वारीचीही खरेदी थांबली

जळगाव -राज्य शासनाने गेल्या आठवड्यात मक्याची खरेदी थांबविल्यानंतर आता ज्वारीची देखील खरेदी थांबविली आहे. राज्यात ज्वारीच्या खरेदीसाठी १ लाख क्विंटलचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. हे उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे शासनाने खरेदी थांबविली आहे. जिल्ह्यात ५ हजार ९५ शेतकऱ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी १ हजार ७०० शेतकऱ्यांकडून ३८ हजार २४८ क्विंटल माल आला; मात्र अद्यापही ३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली असताना माल खरेदी न झाल्याने शेतकऱ्यांनी आता व्यापाऱ्यांकडेच माल विक्री करावा लागणार आहे.

४०० बड्या थकबाकीदारांची यादी तयार

जळगाव: मनपाकडून मालमत्ताकराच्या थकबाकीदारांविरोधात आता कडक कारवाईची मोहीम आखली जाण्याची शक्यता आहे. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी केवळ तीन महिने शिल्लक असून, ५० कोटींहून अधिकची थकबाकी वसूल करण्याचे आव्हान मनपा प्रशासनासमोर आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने आता चारही प्रभाग समितीनिहाय प्रत्येकी १०० बड्या थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली असून, या थकबाकीदारांना मनपाकडून लवकरच नोटीस पाठविण्यात येणार आहे.

हॉकर्सवरील कारवाई थांबवा

जळगाव- शहरातील वाहतूक कोंडीला केवळ हॉकर्सला जबाबदार धरणे योग्य नाही. मुख्य रस्त्यांवरील व्यापारी संकुलांमध्ये पार्किंगची जागाच शिल्लक नाही. पार्किंगसाठी बेसमेंटची कारवाई केल्यास सगळ्याच समस्या सुटतील असे स्पष्ट मत शहर फेरीवाला समितीचे शहरातील प्रतिनिधींनी व्यक्त केले. मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकांकडून हॉकर्सविरुद्धची कारवाई सुरू असल्याने हॉकर्सच्या प्रतिनिधींनी आयुक्त सतीश कुलकर्णी यांची भेट घेतली. हॉकर्सविरुद्धची कारवाई थांबवावी अशी मागणी केली. परंतु हॉकर्समुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत असल्याने कारवाई थांबणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

Web Title: Take action on unauthorized basements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.