पोषण आहार गैरव्यवहार दोन दिवसात कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 01:01 PM2019-08-20T13:01:01+5:302019-08-20T13:01:13+5:30
फाईल सीईओंकडे
जळगाव : पोषण आहारात जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये माल न देता देयके अदा करण्याचा प्रकार चौकशी समितीने समोर आणल्यानंतरही या प्रकरणात ठेकदाराला पाठीशी घातले जात असून यात येत्या दोन दिवसात कारवाई न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा जिल्हा परिषदेच्या सदस्या पल्लवी सावकारे यांनी दिला आहे़ त्यांनी यासंदर्भात सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील यांना पत्र दिले आहे़
या प्रकरणात शिक्षण विभागाने अहवालातही गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले असतानाही कारवाई होत नसल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. शिवाय शिक्षण विभागाचे काही अधिकारीही यांनीही संगनमाने आर्थिक गैरव्यवहार केल्याचा संशय व्यक्त केला आहे़ दरम्यान, याबाबत आपण कारवाई प्रस्तावित केली असून ती फाईल, सीईओंकडे सुपूर्द केली आहे़
आपल्याला या फाईलवर काम करायला अगदी कमी अवधी मिळाल्याचे प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद गायकवाड यांनी सांगितले आहे़