एकनाथ खडसेंची आमदारकी परत घ्या, गुलाबराव पाटलांनी दिलं 'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 12:10 PM2022-12-13T12:10:33+5:302022-12-13T12:11:31+5:30

दुधसंघाच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनेलने १६ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळवले

Take back Eknath Khadse's MLA, Minister Gulabrao Patil gave the 'reason' | एकनाथ खडसेंची आमदारकी परत घ्या, गुलाबराव पाटलांनी दिलं 'कारण'

एकनाथ खडसेंची आमदारकी परत घ्या, गुलाबराव पाटलांनी दिलं 'कारण'

Next

जळगाव - माजी मंत्री एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या जळगाव जिल्ह्यातील दूध संघाच्या निवडणुकीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. राजकारणात एकमेकांचे कट्टर वैरी समजले जाणारे खडसे व महाजन या दोघांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती. सहकार क्षेत्रातील विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या या निवडणुकांच्या निकालात खडसेंच्या पॅनेलचा धुव्वा उडाला. भाजप नेते गिरीश महाजनांची सरशी ठरली असून २० पैकी १६ जागांवर शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे या १६ पैकी ५ उमेदवार हे राष्ट्रवादीच्या गोटातील आहेत. त्यामुळेच, मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंवर प्रहार केला. 

दुधसंघाच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनेलने १६ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळवले. विशेष म्हणजे या निवडणुकीत खडसे परिवाला मोठा धक्का बसला असून एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंचा पराभव झाला आहे. तर, खडसेंच्या पॅनेलचे केवळ ४ उमेदवार निवडून आले आहेत. मात्र, महाजनांच्या पॅनेमधील ५ उमेदवार हे राष्ट्रवादीचेच होते, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी खडसेंची आमदारकीची परत घ्या अशी मागणी केली आहे.

सहकाराची निवडणूक ही थेट पक्षाच्या चिन्हावर होत नसली तरी पक्षाच्या नेत्यासोबत कार्यकर्त्यांनी राहायला हवं अशी अपेक्षा असते. किमान विरोधी पक्षाच्या गोटातून तरी त्यांनी निवडणूक लढवायला नको. मात्र, खडसेंचे निकटवर्तीय असलेल्या पाच उमेदवारांनी महाजन यांच्या शेतकरी पॅनलकडून निवडणूक लढवत खडसे यांच्याच सहकार पॅनल विरोधात विजय मिळवला. त्यामुळं खडसेंवर पराभवाची नामुष्की आली. या निवडणुकीत निम्मी राष्ट्रवादी आमच्यासोबत असल्याचा दावा शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी एकनाथ खडसे यांनीच संपवायला काढली असल्यानं तुमची आमदारकी परत घ्यायला पाहिजे, अशा प्रकारची खोचक टीकाही मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. 

राष्ट्रवादीचे हे ५ नेते महाजनांसोबत

जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाचे एकनिष्ठ असलेले माजी आमदार दिलीप वाघ, माजी जिल्हा उपाध्यक्ष संजय पवार, शामल झाम्रे, प्रदीप निकम, मधुकर राणे इत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांनी ऐनवेळी खडसेंच्या महाविकास आघाडीला राम राम केला. हे सर्वजण गिरीश महाजन यांच्या शेतकरी विकास पॅनलला जाऊन मिळाले. शेवटच्या क्षणी खडसे यांना हा धक्का बसला. 
 

 
 

Web Title: Take back Eknath Khadse's MLA, Minister Gulabrao Patil gave the 'reason'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.