अशी घ्या काळजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:18 AM2021-08-29T04:18:28+5:302021-08-29T04:18:28+5:30
सकाळ संध्याकाळ ब्रश करणे योग्यच मात्र, काही गोड खाल्यानंतर, जेवण झाल्यानंतर पेस्ट न लावता साधा ब्रशही काही सेकंद करून ...
सकाळ संध्याकाळ ब्रश करणे योग्यच मात्र, काही गोड खाल्यानंतर, जेवण झाल्यानंतर पेस्ट न लावता साधा ब्रशही काही सेकंद करून दात स्वच्छ करून घ्यावेत.
चॉकलेट शक्यतोवर लहान मुलांना देऊच नये किंवा ते खाल्ल्यानंतर तातडीने ब्रश करावा किंवा चूळ भरावी, म्हणजे ते चिकटलेले चॉकलेट निघून जाईल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पालकांनी अति लाडात मुलांच्या या छोट्या छोट्या बाबींकडे दुर्लक्ष करू नये.
कोट
चॉकलेट दाताला चिकटून राहते, त्यामुळे दातांच्या लेअरवर परिणाम होतो, त्याची झीज होऊत ते किडतात, तीन ते सहा महिन्यांची ही प्रक्रिया असते. यामुळे दात स्वच्छ ठेवणे, काही खाल्ल्यानंतर चूळ भरणे हे महत्त्वाचे असते. यात पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. दात स्वच्छ किंवा निरोगी नसतील तर लहान मुलांमध्ये न्यूनगंडाचीही भावना येऊ शकते.
- डॉ. सिद्धार्थ चौधरी, सहायक प्राध्यापक दंतशल्यचिकित्सा विभाग