कोणीही आर्थिक गणनेच्या कक्षेबाहेर राहणार नाही याची दक्षता घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:32 AM2020-12-16T04:32:36+5:302020-12-16T04:32:36+5:30

जळगाव : राष्ट्रव्यापी सातव्या आर्थिक गणनेतून कोणताही मोहल्ला, गल्ली, वस्ती गणनेच्या कक्षेबाहेर राहणार नाही याची यंत्रणेने दक्षता घ्यावी, ...

Take care that no one stays out of the realm of financial calculations | कोणीही आर्थिक गणनेच्या कक्षेबाहेर राहणार नाही याची दक्षता घ्या

कोणीही आर्थिक गणनेच्या कक्षेबाहेर राहणार नाही याची दक्षता घ्या

Next

जळगाव : राष्ट्रव्यापी सातव्या आर्थिक गणनेतून कोणताही मोहल्ला, गल्ली, वस्ती गणनेच्या कक्षेबाहेर राहणार नाही याची यंत्रणेने दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्या.

सातव्या आर्थिक गणनेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन. पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा सांख्यिकी अधिकारी प्रमोदराव पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्यासह विविध पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्यासह कॉमन सर्व्हिस सेंटरचे जिल्हा व्यवस्थापक, जिल्हा समन्वयक आदी उपस्थित होते.

गणनेचे काम ३१ डिसेंबरपूर्वी पूर्ण करा

गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवकांना गणना करणाऱ्या प्रगणकास सहकार्य करण्याच्या सूचना द्याव्यात तसेच गावातील संपूर्ण वस्ती गणनेमध्ये समाविष्ट होण्यासाठी गावातील लोकसंख्या, वाॅर्डरचना, नव्याने निर्माण झालेल्या वस्त्यांबाबतची माहिती प्रगणकास देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर गणना करणारे प्रगणक माहिती घेण्यासाठी आल्यानंतर नागरिकांनीही त्यांना सहकार्य करून आवश्यक ती माहिती द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले. जिल्ह्यातील आर्थिक गणनेचे काम सर्वांच्या समन्वयाने ३१ डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

१६८८ प्रगणकांची व ५१९ पर्यवेक्षकांची नोंदणी

जिल्हा सांख्यिकी अधिकारी प्रमोदराव पाटील यांनी जिल्ह्यातील गणनेचे काम पूर्ण करण्यासाठी १६८८ प्रगणकांची व ५१९ पर्यवेक्षकांची नोंदणी करण्यात आल्याची माहिती बैठकीत दिली. तसेच जिल्ह्यात ११५३ ग्रामीण व २१९६ शहरी गटांची संख्या असून, त्यापैकी ११०३ ग्रामीण, तर १५३३ गटांच्या गणनेचे काम पूर्ण झाले आहे. तर ग्रामीण भागात दोन व शहरी भागात १६ गटांचे काम सुरू असून, अद्याप ग्रामीण भागातील ४८ व शहरी भागातील ६४७ गटांचे काम सुरू झाले नसल्याची माहिती दिली. उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी जळगाव, भुसावळ, पाचोरा, यावल व रावेर तालुक्याचे गटविकास अधिकारी व फैजपूर व सावदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी आढावा बैठका घेऊन प्रगणकांना गणनेचे काम पूर्ण होण्यासाठी सहकार्य करण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या.

Web Title: Take care that no one stays out of the realm of financial calculations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.