आमदार मंगेश चव्हाणांचा खटला जलदगती न्यायालयात चालवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:17 AM2021-04-01T04:17:34+5:302021-04-01T04:17:34+5:30
मागणी : वीज कामगार कृती समितीच्या पदाधिकऱ्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट आमदार मंगेश चव्हाणांचा खटला जलदगती न्यायालयात चालवा मागणी : ...
मागणी : वीज कामगार कृती समितीच्या पदाधिकऱ्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट
आमदार मंगेश चव्हाणांचा खटला जलदगती न्यायालयात चालवा
मागणी : वीज कामगार कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट
जळगाव : आमदार मंगेश चव्हाण व त्यांच्या कार्यकर्त्यांनी अधीक्षक अभियंता फारुख शेख यांना मारहाण केल्याप्रकरणी महावितरणच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मंगेश चव्हाणांचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी करून, दोषींना कठोर शिक्षा मिळवून देण्याचीही मागणी केली.
यावेळी कृती समितीचे पदाधिकारी वीरेंद्र पाटील, आर. आर. सावकारे, ज्ञानेश्वर पाटील, विजय सोनवणे, रवींद्र ठाकूर यांच्यासह महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना, महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, विद्युत क्षेत्रीय तांत्रिक कामगार युनियन, बहुजन विद्युत अभियंता अधिकारी कर्मचारी फोरम या संघटनांचे सदस्य उपस्थित होते.
दरम्यान, या प्रकारामुळे जळगाव महावितरणमधील अभियंते अधिकारी व कर्मचारी भयभीत झाले असून, कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला असल्याचे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.
त्यामुळे असा प्रकार पुन्हा होऊ नये, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.