घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 10:47 AM2019-03-10T10:47:32+5:302019-03-10T10:47:39+5:30

जळगावच्या महिला डॉक्टरांचा एडस्ग्रस्त मुलांच्या जीवनात ‘प्रकाश’ आणण्याचा प्रयत्न

Take the hand of the giver ... | घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे...

घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे...

Next
ठळक मुद्देप्रोटीनयुक्त आहाराचे करताय वाटप


चुडामण बोरसे ।
जळगाव : घरात सर्व काही असताना एका महिला डॉक्टरांना आगळा - वेगळा छंद जडला आहे. कवी विंदा करंदीकर यांच्या देणाऱ्याने देत जावे... घेणाºयाने घेत जावे... आणि एक दिवस देणाºयाचे हात घ्यावे... अशीच एक वेगळी सेवा त्या करीत आहेत.
जळगावातील डॉ. नीलीमा प्रकाश सेठीया असे या महिला डॉक्टरांचे नाव. एडस्ग्रस्त मुलांसाठी दर महिन्याला प्रोटीनयुक्त सकस आहार पुरविण्याचे काम ते कुठल्याही मोबदल्याशिवाय करीत आहेत. गेल्या काही वर्षापूर्वी त्या मुलींच्या रिमांड होममध्ये गेल्या होत्या. तिथे त्यांनी मुलींची नेत्र आणि दंत तपासणीची केली. यातून मग मुलांच्या सेवेचा छंदच त्यांना लागला. एकदा मग जळगावातील होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. रितेश पाटील यांच्याशी त्यांची ओळख झाली. यातून मग एडस्ग्रस्त मुलांसाठी काहीतरी करायला हवे, हा विचार पुढे आला. सुरुवातीला त्यांनी एका एडस्ग्रस्त मुलाला दत्तक घेतले. मग हळू हळू ही संख्या वाढू लागली आणि आज जवळपास ७० एडस्ग्रस्त मुलांना त्या महिन्याला सकस आहार पुरवित आहेत. कधी निधी जमा करुन तर कधी पदरमोड करुन. जागतिक आरोग्य संघटनेने एडस्ग्रस्त मुलांच्या आहारात काय असावे, याचे मागदर्शक तत्वे आखून दिली आहेत. त्यानुसार हा आहार दिला जातो. विशेष म्हणजे डॉ. नीलीमा सेठीया यांच्या हाकेला जळगावातील अनेक दाते पुढे आले आहेत. ते दर महिन्याला न चुकता आहारासाठी निधी एकत्र करुन तो त्यांच्याकडे देत असतात. नीलीमा यांनी स्वत: एडस्ग्रस्त ११ मुले दत्तक घेतली आहेत. त्यांच्यासह त्या आज जवळपास ७० मुलांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत.
मराठे ता. चोपडा येथील आश्रमशाळेलाही डॉक्टरांनी मोठी मदत केली आहे. तीन वर्षापूर्वी त्या या आश्रमशाळेत गेल्या होत्या. त्यावेळी तिथे फक्त एक आठवडा पुरले एवढेच अन्नधान्य होते. डॉ. सेठीया यांना हे कळताच त्यांनी आपल्या ओळखीच्या लोकांना याची माहिती दिली आणि अखंडपणे मदतीचा ओघ सुरु झाला. तो आजतागायत सुरु आहे.

Web Title: Take the hand of the giver ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.