जळगावातील गोलाणी मार्केटमधील बेकायदा गाळे ताब्यात घ्या - जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:20 PM2017-07-19T12:20:32+5:302017-07-19T12:20:32+5:30
मार्केटमध्ये सलग दुस:या दिवशी स्वच्छता मोहीम सुरूच होती.
Next
ऑ लाईन लोकमतजळगाव, दि. 19 - गोलाणी मार्केटमध्ये बेकायदा दाबा घेऊन असलेल्या गाळे धारकांची दुकाने ताब्यात घ्यावे तसेच बुधवार पासून दुकान निहाय तपासणीची मोहीम हाती घेण्याचा निर्णय जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी मंगळवारी घेतला. मार्केटमध्ये सलग दुस:या दिवशी स्वच्छता मोहीम सुरूच होती. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर हे मनपाच्या अधिका:यासह गोलाणी मार्केटमध्ये पोहचले. सभागृहातून काढला 12 ट्रॅक्टर कचरातिस:या मजल्यावर एका सभागृह जणू कचराकुंडी झाले आहे. या सभागृहाच्या साफसफाईची मोहिम आज सुरु झाली. त्यातून 12 टॅक्टर कचरा काढण्यात आला. सकाळी 9.30 ते दुपारी 2 वाजर्पयत हे कामकाज सुरू होते.