जळगाव येथे अतिक्रमण विरोधात कारवाई करीत असताना झटापटीत भाजीपाल्याची हातगाडी पडली नाल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:28 PM2017-12-29T12:28:21+5:302017-12-29T12:29:34+5:30

भाजीपाला विक्रेता पोहचले पोलीस ठाण्यात

Taking action against encroachment at Jalgaon | जळगाव येथे अतिक्रमण विरोधात कारवाई करीत असताना झटापटीत भाजीपाल्याची हातगाडी पडली नाल्यात

जळगाव येथे अतिक्रमण विरोधात कारवाई करीत असताना झटापटीत भाजीपाल्याची हातगाडी पडली नाल्यात

googlenewsNext
ठळक मुद्देगाडी नाल्याला लागून असलेल्या रस्त्याकडे नेलीमनपाचे पथकही पाठीमागे पळत गेले

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 29- शहरातील  वाल्मिकनगर परिसरात अतिक्रमण निमरूलन विभागातील कर्मचारी भाजी विक्रेत्यांची गाडी जप्त करत असताना झालेल्या झटापटीत ही गाडी थेट नाल्यात पडल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी घडला. 
जैनाबाद भागातील भाजी विक्रेता युवक सुरेश पुंडलिक बाविस्कर याने सकाळी कृषि उत्पन्न बाजार समिती भागातून भाजी खरेदी केल्यानंतर तो नेहमीप्रमाणे वाल्मिकनगर भागात सकाळी 10.30 वाजेच्या दरम्यान गाडी घेऊन आला. या भागातील पुलाजवळ तो उभा असताना अतिक्रमण निमरूलन विभागाचे पथक येत असल्याचे दिसल्याने त्याने आपली गाडी नाल्याला लागून असलेल्या रस्त्याकडे नेली. मनपाचे पथकही त्याच्या पाठीमागे पळत गेले.  गाडी जप्तीसाठी या ठिकाणी झटापट सुरू असताना ही गाडी रस्त्यावरून घसरून नाल्यात पडली. याप्रश्नी तक्रार देण्यासाठी भाजीपाला विक्रेता सकाळी 11.30 वाजेच्या दरम्यान शनिपेठ पोलीस स्टेशनला गेला होता. 

Web Title: Taking action against encroachment at Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.